महेश मांजरेकरांच्या लेकीचे 'ते' फोटो, सोशल मीडियावर एकचं खळबळ...

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून तिची बरीच चर्चा आहे.

Updated: Apr 8, 2022, 02:02 PM IST
महेश मांजरेकरांच्या लेकीचे 'ते' फोटो, सोशल मीडियावर एकचं खळबळ...  title=

मुंबई : निर्माता- दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरने सलमानसोबत 'दबंग ३' या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. सोशल मीडियावर नेहमी गेल्या काही दिवसांपासून तिची बरीच चर्चा आहे. इतकच नव्हे, तर तिच्या सोशल मीडिया फॉलोअर्सचा आकडाही दिवसागणिक वाढतच चालला आहे. सईने सोशल मीडियावर फोटो शेअर करताच ते व्हायरल होतात. असाच एक फोटो सईने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आणि या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यावेळीही सई तिच्या फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

शेअर केलेल्या फोटोत सई ब्लॅक क्रॉप टॉप आणि ब्लॅक टाईट्स मध्ये दिसत आहे. सईने हा लूक पुर्ण करण्यासाठी केस मोकळे सोडले आहेत. त्याचबरोबर हलका मेकअपसह अभिनेत्रीने हा लूक कॅरी  केलाय. या फोटोत सई खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे.  फोटो शेअर करताच चाहत्यांसोबत सेलिब्रिटींनीही या फोटोवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केलाय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्री सई मांजरेकर ही महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांची मोठी मुलगी आहे. सलमान खानसोबत दंबग ३ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये तिने पदार्पण केलं आहे. या सिनेमात तिने सलमान खान सोबत स्क्रिन शेअर केली आहे. सईने तिच्या पहिल्या सिनेमातूनच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली. दबंग 3 नंतर सई आयुष शर्मासोबत 'मांझा' या गाण्यात दिसली होती. आगामी सिनेमा 'मेजर' मध्येही ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा २७ मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  याशिवाय ती 'घानी' या सिनेमात दिसणार आहे.