करीना कपूर अभिषेकला का बोलली 'जीजू'? हे नातं कोणतं

करिना कपूर कायमच आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत 

Updated: Dec 1, 2021, 01:09 PM IST
करीना कपूर अभिषेकला का बोलली 'जीजू'? हे नातं कोणतं

मुंबई : अभिनेत्री करीना कपूर कायमच आपल्या नात्यामुळे चर्चेत असते. 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या सैफसोबत करीनाने लग्न केलं. पण लग्ना अगोदर देखील ती आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होती. 

शाहिदला डेट करणाऱ्या करीनाने अभिनेता अर्जुन कपूरसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अशी आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असलेली करीना अभिषेकला मात्र वेगळ्याच नावाने हाक मारते. 

करीना कपूर अभिनेता अभिषेक बच्चनला 'जीजू' या नावाने हाक मारते. या नात्यामागचं कारण काय? करीना आणि अभिषेकमध्ये असं नेमकं कोणतं नातं आहे? ज्यामुळे करीना अभिषेकला सगळ्यांसमोर 'जीजू' ही हाक मारते. 

करीना - अभिषेकच्या नात्यामागची गोष्ट? 

अभिनेता राज कपूर यांची नात करिश्मा कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन एकमेकांना पसंत करत होते. या दोन्ही कुटुंबियांचा या नात्याला सपोर्ट होता. महत्वाच म्हणजे जया बच्चन यांनी देखील करिश्माला सुन म्हणून स्विकारलं. 

जया बच्चन यांनी देखील एका भर कार्यक्रमात करिश्माचा सून म्हणून उल्लेख केला होता. मात्र काही जोड्या या देवानेच बनवलेल्या असतात. अभिषेक बच्चन याची जोडी ऐश्वर्या रायसोबत देवाने लिहिली होती. 

अभिषेकच्या नशिबात मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) चं प्रेम लिहिलं होतं. सगळ्यांची इच्छा असूनही अभिषेक आणि करिश्मा एकत्र येऊ शकले नाहीत. मात्र या मागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

अभिषेकची पहिली पसंत करिश्मा कपूर

अभिषेक बच्चनची पहिली पसंती करिश्मा कपूर होती. बच्चन कुटुंब आणि कपूर कुटुंबातही दूरचे नातेवाईक होते. ज्याचे रुपांतर घनिष्ठ नातेसंबंधात करण्यात जया बच्चन आनंदी होत्या. वास्तविक, अमिताभ बच्चन आणि जयाची लाडकी मुलगी श्वेता बच्चन हिचे लग्न करिश्मा कपूरच्या आत्या म्हणजेच रितू नंदा यांचा मुलगा निखिल नंदासोबत झाले आहे. (सैफला सोडून 'या' अभिनेत्यासोबत करीना थाटणार संसार? स्वत: अभिनेत्रीकडून वक्तव्य) 

 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नादरम्यानच करिश्मा आणि अभिषेक एकमेकांना चांगले ओळखत होते, ज्याचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. यानंतर 'येस मैने भी प्यार किया' या चित्रपटात एकत्र काम करून अभिषेक आणि करिश्मा खूप जवळ आले. दोघांच्याही घरच्यांचा या नात्याला विरोध नव्हता.

करीना 'रिफ्यूजी'च्या सेटवर बोलायची जीजू

करिश्मा कपूरने अनेक सुपरहिट चित्रपट देऊन बॉलिवूडमध्ये आपले खास स्थान निर्माण केले होते.  अभिषेक बच्चनही आपल्या करिअरमध्ये चांगली कामगिरी करत होता. अभिषेकला करिश्माची धाकटी बहीण करीना कपूरसोबत 'रिफ्युजी' चित्रपटाची ऑफर आली होती. अभिषेकला भेटण्यासाठी करिश्मा कपूर 'रिफ्युजी'च्या सेटवर यायची. करीना तिचा सहकलाकार अभिषेक याला जीजू म्हणायची. कारण अभिषेक आणि करिश्माचे लग्न होणार हे सर्वांनाच माहीत होते.(वहिनीशीच लग्नगाठ बांधणाऱ्या अभिनेत्यावर खिळल्या नजरा; Photo Viral) 

 

जय बच्चनने स्वतः करिश्माला म्हटलं 'सून'

खुद्द जया बच्चन यांनी करिश्मा कपूरला सर्वांसमोर आपली सून बनवण्याची घोषणा केली होती. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी, सर्वांच्या उपस्थितीत, जया यांनी करिश्मा कपूरची तिच्या भावी कुटुंबातील सदस्या म्हणजेच सून, हातात माइक धरून ओळख करून दिली. जया म्हणाल्या होत्या की, 'आज बच्चन आणि नंदा कुटुंब आणखी एका कुटुंबाला आपल्या समूहाचा भाग बनवणार आहे आणि ते म्हणजे कपूर कुटुंब.

यानंतर करिश्मा जया आणि अभिषेकच्या जवळ स्टेजवर लाजत आणि लाजत उभी राहते. यावेळी बबिता आणि रणधीर कपूरही उपस्थित होते. जया एवढ्या आनंदात होत्या की, अभिषेकच्या वतीनेही पापा अमिताभ यांना वाढदिवसाची भेट म्हणून सांगण्यात आले. अमिताभ-जया यांच्या जवळचे राजकारणी अमर सिंहही यावेळी उपस्थित होते. या खास प्रसंगाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (मुक्काबाज फेम अभिनेता Vineet Kumar Singh लग्नबंधनात अडकला) 

 

दोन कुटुंब मात्र एक होऊ शकले नाहीत 

पण चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कुटुंबे नात्यात अडकता अडकता राहिली. मात्र, स्पष्ट कारण समोर आले नाही. पण हे नातं तोडण्यामागे दोन्ही आईंचा हात असल्याचं बोललं जातंय. जया बच्चन यांना लग्नानंतर आपल्या सुनेने चित्रपटात काम करावे असे वाटत नव्हते, तर बबिताला अभिषेकसोबत आपल्या मुलीच्या भविष्यासाठी योग्य वाटले नाही. हीच गोष्ट समोर आली, बाकी वास्तव फक्त बच्चन आणि कपूर कुटुंबालाच कळणार.