सलमान खानवर का आली सुनिल शेट्टीच्या मुलीची माफी मागण्याची वेळ?

'पिंच 2' या शोचा होस्ट आणि अभिनेता अरबाज खानने सलमानला एक प्रश्न विचारला. 

Updated: Jul 25, 2021, 03:46 PM IST
सलमान खानवर का आली सुनिल शेट्टीच्या मुलीची माफी मागण्याची वेळ?

मुंबई : बॉलिवुड अभिनेता सलमान खान (Salman Khan) चा भाऊ अरबाज खान याच्या  'पिंच 2' या शोची सध्या चांगलीच चर्चा आहे. त्याच कारण म्हणजे या कार्यक्रमात सलमानने गेस्ट म्हणून हजेरी लावली होती. यावेळी त्याला सिनेमांबद्दल आणि खाजगी आयुष्याबदद्ल अनेक प्रश्न विचारण्यात आाले. पण सलमानने सुनील शेट्टीच्या मुलीची माफी मागितली. आता तुम्ही  विचार करत असाल की, बॉलिवूडच्या भाईजानला अथिया शेट्टीची माफी का मागावी लागली?  

'पिंच 2' या शोचा होस्ट आणि अभिनेता अरबाज खानने सलमानला एक प्रश्न विचारला. सोशल मीडियावर अथिया शेटी,कतरिना कैफ आणि संगीता बिजलानी या तिघींपैकी तू कोणला फॉलो करत नाही.

अरबाजने सलमानला विचारलं, की ट्विटर  117 मिलियन फॉलोवर्स असताना  तू फक्त 24 जणांना फॉलो करतो. आणि इंस्टाग्रामवर फक्त  25 लोकांना फॉलो करतोस. मी तुला 3 नाव देत आहे, यातील कोणाला तू इंस्टाग्रामवर फॉलो करणं टाळशील. जे तुला सोशल मीडियावर फॉलो करत आहेत.

सलमानने अथिया शेट्टीची हात जोडून मागितली माफी 

अरबाजच्या प्रश्नाचं उत्तर देत सलमानने संगीता बिजलानीचं नाव घेतलं. यावर अरबाजने सलमानला तू चुकीचं उत्तर देत असल्याचं म्हटलं. त्यानंतर सलमाने अथिया शेट्टीचं नाव घेतलं. पण काही वेळानंतर कॅमेरा समोर हात जोडत सलमानने अथियाची माफी देखील मागितली. सलमान म्हणाला, " मला माफ कर अथिया, मी आतापासून तुला फॉलो करणार आहे. "

सलमानने अथिया शेट्टीची माफी मागितली हे अभिनेता सुनिल शेट्टीला कळाल्यानंतर त्याने सलमानसोबतच नातं कसं आहे हे सांगितलं.सुनिल शेट्टीने म्हटलं की, सलमान फॅमिलीतील सदस्यांसारखाचं आहेत. सलमान जे काही करतो ते मनापासून करतो. त्यांनी स्क्रीनवर जेव्हा माझ्या मुलीची माफी मागितली, ते पाहून खूपच मजेशीर वाटलं. 

सलमान खान पहिल्यांदाच अरबाज खानच्या 'पिंच 2' या शोचा भाग बनला होता. या शोच्या पहिल्या सीजनमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आणि खाजगी लाईफमधील अनेक मजेशीर गोष्टींचा खुलासा केला होता.