अभिनेत्याला अनेक महिलांशी शारिरीक संबध ठेवणं पडलं महागात; बिघडली तब्येत

गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्याचे अनेक मुलींशी शारीरिक संबंध होते.

Updated: Apr 29, 2022, 08:19 PM IST
अभिनेत्याला अनेक महिलांशी शारिरीक संबध ठेवणं पडलं महागात; बिघडली तब्येत title=

मुंबई : हॉलिवूडचा सुपरस्टार विल स्मिथच्या आयुष्याविषयी त्याच्या चाहत्यांना बरीच माहिती आहे. पण त्यांच्या आयुष्याशी निगडीत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजपर्यंत लोकांना माहित नव्हत्या. अलीकडेच, विल स्मिथचं चरित्र पुस्तक प्रकाशित झालं आहे. त्यानंतर विल सतत चर्चेत आहे. विलने आपल्या पुस्तकात दावा केला आहे की, गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याचे अनेक मुलींशी शारीरिक संबंध होते.

अनेक स्त्रियांशी संबंध
अभिनेत्याने आपल्या पुस्तकात सांगितलंय की, त्याच्या प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याचं अनेक महिलांशी शारिरीक संबंध होते की, तो आजारी पडला. विल स्मिथचे हे पुस्तक या महिन्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध झालं. यामध्ये त्याने त्याचं आजवरचं आयुष्य आणि त्यांचे अनुभव सांगितले आहेत.

सेक्स केल्यानंतर आजारी पडले
विल स्मिथनं सांगितलं की, ज्या मुलीसोबत त्याचं ब्रेकअप झालं ती फक्त 16 वर्षांची होती. विल स्मिथ म्हणाला, 'ब्रेकअप माझ्यासाठी असह्य झाला होता. त्यानंतर मी अनेक महिलांशी जवळीक साधू लागलो. असं करण्यामागचं कारणही अभिनेत्याने सांगितलं. तो म्हणाला की मला आराम हवा होता कारण हार्टब्रेकवर औषध नाही.

इतक्या लोकांशी संबंध का निर्माण करायचा?
विल स्मिथने सांगितलं की, त्या मुलीवरून आपलं लक्ष वळवण्यासाठी आणि डिप्रेशन टाळण्यासाठी, भरपूर शॉपिंग करण्याचा आणि अनेक मुलींशी संबंध ठेवण्याचा अवलंब केला. विल स्मिथने सांगितलं की, रिलेशनशिपमध्ये असताना तो फक्त एका मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवत होता. पण ब्रेकअपनंतर त्याने अनेक मुलींसोबत संबंध ठेवायला सुरुवात केल्यानं त्याची तब्येत बिघडली.