नेमकी का दाखल झालीय प्रिया प्रकाशविरुद्ध याचिका दाखल? जाणून घ्या...

दक्षिणेतील बहुचर्चित अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर आपल्या 'उरु अदार लव' या गाण्यातील आपल्या अदांमुळे चांगलीच चर्चेत आली. या गाण्यातील एक छोटासा भाग फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियावर भलताच वायरल झालेला दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका चर्चिला गेला की प्रिया एका रात्रीच 'स्टार' बनली... पण, सोबतच या गाण्यामुळे प्रियाविरुद्ध अनेक खटलेही दाखल करण्यात आले... आणि त्यामुळे ती अडचणीतही आली. 

Updated: Apr 9, 2018, 09:13 PM IST
नेमकी का दाखल झालीय प्रिया प्रकाशविरुद्ध याचिका दाखल? जाणून घ्या...  title=

नवी दिल्ली : दक्षिणेतील बहुचर्चित अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर आपल्या 'उरु अदार लव' या गाण्यातील आपल्या अदांमुळे चांगलीच चर्चेत आली. या गाण्यातील एक छोटासा भाग फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियावर भलताच वायरल झालेला दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका चर्चिला गेला की प्रिया एका रात्रीच 'स्टार' बनली... पण, सोबतच या गाण्यामुळे प्रियाविरुद्ध अनेक खटलेही दाखल करण्यात आले... आणि त्यामुळे ती अडचणीतही आली. 

आता पुन्हा प्रियाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आलीय. यामध्ये 'उरु अदार लव' या गाण्यातील एका सीनमध्ये प्रिया डोळे मिचकावताना दिसते... आणि हेच इस्लाममध्ये हराम आहे, असा उल्लेख या याचिकेत करण्यात आलाय. हैदराबादमध्ये ही याचिका दाखल करण्यात आलीय. 

प्रियाच्या या गाण्याविरुद्ध फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्राच्या एका स्थानिक संघटनेनं मुस्लिमांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला होता. सिनेमाचे दिग्दर्शक ओमर लुलु यांच्याविरुद्धही पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. महाराष्ट्रातील जिंसी पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली होती. प्रियानं मल्याळम सिनेमा 'उरु अदार लव' गाण्यावरून निर्माण झालेल्या वादावरून आपल्याविरुद्ध दाखल झालेली एफआयआर रद्द करण्यासाठी एक याचिका दाखल केली होती. 

मूळची केरळच्या त्रिशूरची असलेली १८ वर्षांची प्रया बीकॉमच्या पहिल्या वर्षाला शिकतेय. प्रियाचा डेब्यु सिनेमा 'उरु अदार लव'चं गाणं 'मानिक्य मलाराया पूवी' चर्चेचा विषय ठरलंय. प्रियाला इन्स्टाग्रामवर एक दिवसात सहा लाखांहून अधिक लोकांनी फॉलो केलंय.