ओम आणि स्वीटूचा धमाकेदार डान्स परफॉर्मन्स

कोळी गीतावर थिरकणार ओम स्वीटू ची पाऊलं

Updated: Feb 20, 2021, 12:38 PM IST
ओम आणि स्वीटूचा धमाकेदार डान्स परफॉर्मन्स title=

मुंबई : एका गोड नात्याची कथा सांगणारी झी मराठीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेला प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिला अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय झाले आहेत. अन्विता फलटणकर आणि शाल्व किंजवडेकर ह्या फ्रेश जोडीने तरुणाईवर छाप सोडली आहे.

प्रत्येक पावलावर स्वीटूला मदत करणारा आणि तिच्या सोबत सावली सारखा उभा राहणारा ओम या दोघांमध्ये आता मैत्रीचं नातं बहरत असतानाच काही कारणाने दोघांमध्ये अबोला निर्माण झाला, पण त्यांच्यातला अबोला दूर करण्यासाठी रॉकी ने पुढाकार घेतलाय. ओम आणि स्वीटू कंपनी प्रेझेंटेशन साठी बाहेर पडणार आहेत, यावेळी त्यांच्या सोबत मोमो, रॉकी आणि मोहित सुद्धा असणार आहे..

स्वीटु तीच पहिलं वहिला प्रेझेंटेशन देणार आहे, जे अगदी चांगलं होणार आहे. पण तरीही स्वीटु आणि ओम यांच्यातील अबोला कायम राहणार आहे आता स्वीटु आणि ओम एकमेकांशी बोलावेत आणि त्यांना एकत्र वेळ मिळावा यासाठी रॉकी गाडीच टायर पंचर करतो.त्यामुळे प्रेझेंटेशन साठी गेलेल्या ओम आणि  स्वीटूला तिथेच थांबण्या शिवाय पर्याय उरत नाही.

तेव्हाच प्रेझेंटेशन साठी भेटलेल्या client पैकी एक जण सर्वाना थांबण्याचा आग्रह करतात.. आणि आज कोळी फेस्टीवल असल्याचं सांगत तुम्हीही या कार्यक्रमाला थांबा असं सांगतात. येत्या रविवारी म्हणजेच २१ फेब्रुवारीला संध्याकाळी ७ वा. स्वीटु आणि ओमचा कोळी अंदाज पाहायला विसरू नका.