हाच खरा जेंटलमॅन... मलायकासोबत असलेल्या व्यक्तीचा तुम्हालाही वाटेल अभिमान, Video Viral

मलायकासोबत असलेल्या व्यक्तीने असं काय केलं, ज्यामुळे त्याचं होतय कौतुक, Video Viral पाहिल्यनंतर तुम्हालाही वाटेल अभिमान  

Updated: Aug 7, 2022, 03:12 PM IST
हाच खरा जेंटलमॅन... मलायकासोबत असलेल्या व्यक्तीचा तुम्हालाही वाटेल अभिमान, Video Viral  title=

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा कायम प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अनेकदा आपल्या हॉट आणि बोल्ड अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी मलायका पुन्हा चर्चेत आली आहे. सध्या रंगणाऱ्या चर्चांना कारण देखील अत्यंत खास आहे. मलायका आता चर्चेत आली आहे एका व्हिडीओमुळे. मलायकाला कायम पार्ट्यांमध्ये वेग-वेगळ्या लूकमध्ये स्पॉट केलं जातं. आता देखील लाल रंगाच्या ड्रेसमधील मलायकाचा हॉट अंदाज चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. अशात मलायका लूक सर्वांना आवडला असला तरी, अभिनेत्रीच्या शेजारी असलेल्या व्यक्तीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

सध्या या व्यक्तीसोबत मलायकाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मलायका पापाराझींना पोज देताना दिसत आहे. यावेळी मलायकासोबत एक व्यक्ती दिसत आहे. पण मलायकासोबत पोज देताना त्या व्यक्तीने मलाइकाला स्पर्शही केला नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्यक्तीचा असा स्वभाव प्रत्येकाच्या मनात घाव घालत आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला सोशल मीडियावर 'जेंटलमॅन' म्हणून संबोधत आहेत. सध्या मलायका आणि अभिनेत्रीसोबत असलेल्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर अनेकांनी व्हिडीओ शेअर देखील केला आहे. 

दरम्यान मलायका तिच्या प्रोफेशन आणि खासगी आयुष्याबाबत देखील चर्चेत असते. घटस्फोटानंतर मलायका आणि अरबाज दोघेही आपापल्या आयुष्यात आनंदी आहेत. मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत असताना, अरबाज खान देखील इटालियन मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीसोबत नात्यात आहे. घटस्फोटानंतर या दोघांनी डेट करत असलेल्या व्यक्तीसोबत अद्याप लग्न केलेलं नाही.