घरात घूसून मॉडेलची गळा चिरून हत्या

हत्ये प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू

Updated: Jul 12, 2021, 12:48 PM IST
घरात घूसून मॉडेलची गळा चिरून हत्या title=

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये (Pakistan) महिलांविरूद्ध होणारे अपराध अद्यापही थांबलेलं नाही. दरम्यान लाहौरमध्ये एका मॉडेलची गळा चिरून हत्या अज्ञातांनी केली आहे. पोलिसांना 29 वर्षीय मॉडेल नायब नदीमचा (Nayab Nadeem)मृतदेह तिच्या राहत्या घरात आढळला आहे. त्यामुळे परिसरात  पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या रिपोर्टनुसार नायब नदीमच्या हत्येची तक्रार तिच्या भावाने पोलिसात केली. नायबच्या भावाने केलेल्या तक्रारीच्या आधारावर सध्या पोलिसांचा तापस सुरू आहे. 

डिफेन्स बी पोलीस स्टेशनचे एसएचओ नैयर निसार म्हणाले की, बहुधा या मॉडेलची गळा दाबून हत्या करण्यात आली. पण पोस्टमार्टमनंतर सर्व काही स्पष्ट होईल असं देखील पोलिसांनी सांगितलं आहे. मॉडेलच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार. 9 जुलै रोजी मध्यरात्री मॉडेलचा भाऊ तिच्या घरी पोहोचला. तेव्हा त्याला नायब मृत्यूदेह जमीनीवर पडलेला आढळला. 

तिच्या मानेवर घाव असल्याची माहिती देखील मॉडेलच्या भावाने दिली. शिवाय घरातील बाथरूमच्या काचा तुटलेल्या होत्या असं देखील त्याने सांगितलं. नायब घरी एकटीचं राहात होती. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.