हॉलिवूडचा प्रयोग मराठीत: झपाटलेला 3 चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे! पाहा कसं होणार शक्य…

झपाटलेला सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे त्याचा येणारा तिसरा भाग. महत्त्वाचं म्हणजे या भागात लक्ष्मीकात बेर्डे यांची एन्ट्री होणार आहे. यासाठी मराठी सिनेमात हॉलिवूडने केलेला प्रयोग पाहायला मिळणार आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 1, 2024, 05:44 PM IST
हॉलिवूडचा प्रयोग मराठीत: झपाटलेला 3 चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे! पाहा कसं होणार शक्य… title=

Zapatlela 3 : मराठी सिनेसृष्टीला वेगळी ओळख निर्माण करुण देणारा सिनेमा म्हणजे 'झपाटलेला'. या सिनेमातील जोडी अतिशय लोकप्रिय ठरली ती म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे. या जोडीने अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं. या सिनेमाचा दुसरा भाग देखील प्रेक्षकांनी एन्जॉय केला. आता या सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या तिसऱ्या भागात लक्ष्मीकांत बेर्डे पाहायला मिळणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Satyajit Ramdas Padhye (@satyajitpadhye)

अशा पद्धतीने होणार लक्ष्मीकांत बेर्डेची एन्ट्री 

‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ म्हणजे AI चा वापर करून लक्ष्मीकांत बेर्डेची एन्ट्री 'झपाटलेला' सिनेमाच्या तिसऱ्या भागात होणार आहे.  दिग्दर्शक महेश कोठारे यांनी एका कार्यक्रमात हे पात्र ‘रिक्रिएट’ करायचे प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. तिसऱ्या भागात ‘एआय’च्या वापरातून लक्ष्मीकांत बेर्डे पडद्यावर पुन्हा जादू करणार, याबाबत सगळेच उत्सुकता आहेत. ‘झपाटलेला 3’ या सिनेमाच्या चित्रिकरणाची तयारी सुरू झाली आहे. ‘एआय’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.   या निमित्तानं मराठी सिनेमात पहिल्यांदाच ‘एआय’चा वापर करण्यात येणार असल्याचं कळतंय.

 हॉरर-कॉमेडी जॉनर असलेल्या या सिनेमाच्या दोन भागांनी आतापर्यंत प्रेक्षकांचं मन जिंकल होतं.  ‘झपाटलेला’ त्यापैकीच एक. या सिनेमाच्या तिसऱ्या भागाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं असून 2025 मध्ये तो प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

हॉलिवूडमध्ये झालाय 'हा' प्रयोग 

फास्ट ऍण्ड फ्युरियसच्या 7 व्या भागात अभिनेता पॉल वॉकरला AI च्या माध्यमातून सिनेमात दाखवण्यात आलं आहे. यासाठी त्याच्या भावाला अभिनलय करायला लावून नंतर तेथे AI च्या मदतीने फोटो लावण्यात आला. यामुळे Fast 7 रिलीज होण्यापूर्वी अभिनेता पॉल वॉकरचा अपघाती मृत्यू झाला होता.