लॉकडाऊनमध्ये नवीन मालिकांसह 'झी मराठी' प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज

लॉकडाऊनवरती झी मराठी वाहिनीकडे आहे इलाज - नवीन मालिका देणार मनोरंजनाचा डोस

Updated: Jun 1, 2020, 02:27 PM IST
लॉकडाऊनमध्ये नवीन मालिकांसह 'झी मराठी' प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज

मुंबई : लॉकडाउनमुळे सर्व मालिकांचं चित्रीकरण पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे मालिकांचे जुने भाग, जुन्या काही मालिकांचं पुनःप्रक्षेपण आणि पूर्वीचे पुरस्कार सोहळे यांचं प्रक्षेपण सध्या वाहिन्यांवर होत आहे. पण आता प्रतीक्षा संपली कारण महाराष्ट्राची महावाहिनी झी मराठी आपल्यासाठी घेऊन येत आहे मर्यादित भागांच्या नवीन मालिका आणि रिऍलिटी शोज. लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाचे काही क्षण देण्यासाठी हे कार्यक्रम सज्ज झाले आहेत.

प्रेक्षकांच्या दिवसाची सुरुवात आता ‘राम राम  महाराष्ट्र’ या कार्यक्रमाने आणि त्यात भगरे गुरुजींच्या ‘श्लोक, दिनविशेष आणि वेध भविष्याचा’ याने होईल. सकाळी ८ वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येईल. तसेच या लॉकडाऊनमध्ये देखील तमाम वहिनींना संधी मिळेल पैठणीचा खेळ खेळण्याची. संध्याकाळी ६.३० वा आदेश भावोजी ‘होम मिनिस्टर घरोघरी’ च्या माध्यमातून पुन्हा एकदा वहिनींशी गप्पा मारण्यासाठी सज्ज होणार आहेत. लॉकडाऊन काळात सर्वजण घरात बसले असताना वहिनी आणि मिस्टरांमधील काही अनएक्सप्रेस्ड गोष्टी पत्राद्वारे आपल्या समोर येतील. घरकामात मिस्टरांची वहिनींना कशी मदत होते, ह्याचे काही मजेशीर क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

या शिवाय 'घरात बसले सारे' या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा लाडका बोलका बाहुला अर्धवट राव, आवडाबाई त्यांच्या फॅमिली प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. घरातील तू तू मै मै आणि त्यांच्या जीवनात घडण्याऱ्या मजेशीर गोष्टी या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तसेच छोटू सिंगची लव्हस्टोरी या मालिकेचे खास आकर्षण असणार आहे, हा कार्यक्रम संध्या. ७ वाजता पाहता येणार आहे.

काही नवीन कार्यक्रम झी मराठी या लॉकडाउनच्या काळात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सादर करण्याचं पाऊल उचललं आहे. या मालिकांमधून थोड टेंशन कमी होईल यात शंकाच नाही, तेव्हा पाहायला विसरू नका ह्या नव्या कोऱ्या मालिका राम राम महाराष्ट्र, होम मिनिस्टर घरोघरी आणि 'घरात बसले सारे' ८ जून पासून झी मराठीवर.

'झी मराठी'चे बिझनेस हेड निलेश मयेकर म्हणाले की, गेली २० वर्ष 'झी मराठी' प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या लॉकडाऊन काळात मालिकांचे चित्रीकरण बंद असल्यामुळे प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांमध्ये खंड पडला. पण आता झी मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा सज्ज होत आहे, काही नवीन प्रयोग करत आहोत. आशा आहे की प्रेक्षक या प्रयोगाला पसंती देतील.