...म्हणून मलेशियातही चर्चा 'ZEE5' ची

सबस्क्रायबर्सना नव्या सुविधा 

Updated: Mar 5, 2019, 04:23 PM IST
...म्हणून मलेशियातही चर्चा 'ZEE5' ची  title=

क्वालालांपूर :  क्वालालांपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत  ZEE5 त्या बिझनेस ऑफिसर या पदी असणाऱ्या अर्चना आनंद यांनी एक मोठी घोषणा केली. मलेशियातील सर्वाधिक वापरात असणाऱ्या आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशा दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या 'सेलकॉम'सोबत ZEE5 ने हातमिळवणी केली आहे. 

दोन मोठ्या ब्रँडमध्ये झालेल्या या हातमिळवणीमुळे एपिगेट्सच्या डायरेक्ट कॅरिअर बिलिंगच्या माध्यमातून पेसे देण्यासाठी एक सुरक्षित अशा सेवेतचा अनुभव घेता येणार आहे. ZEE5 च्या अफलातून अशा कंटेंट बकेटसाठी हे सब्सक्रिप्शन त्यांना घेता येणार आहे. 

Zee Entertainment Enterprises Limited (ZEEL) चा एक भाग असणाऱ्या ZEE5 मध्ये जवळपास एक लाखाहून अधिक चित्रपट, टेलिव्हीजन कार्यक्रम, बातम्या, व्हिडिओ आणि काही एक्सक्लुझिव्ह सीरिजचा समावेश आहे. हिंदी, इंग्रजी, बंगाली, पंजाबी, मल्याळम, तमिळ, कन्नड, मराठी, ओरिया, भोजपूरी आणि गुजराती अशा विविध भाषांमध्ये मनोरंजनाचे हे पर्याय उपलब्ध आहेत. त्यात भर म्हणून आणखी ६० इतर वाहिन्याही आहेत. 

ZEE5 आणि सेलकॉममध्ये झालेल्या या हातमिळवण्यामुळे 'सेंबरुथी', 'पूवे पुचूदावा' आणि 'यारादी नी मोहिनी' अशा टेलिव्हीजिन शो शिवाय 'कालिच्चीरीप्पू', 'अमेरिका मापिल्लै', 'डी 7' अशा खास सीरिज पाहता येतील. शिवाय 'मर्सल' आणि 'कलवू' या चित्रपटांचा नजराणाही प्रेक्षकांना पाहता येणार आहे. यामध्ये 'केदारनाथ', 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटांचाही समावेश आहे. मार्टकेटची सध्याची स्थिती पाहता ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्यांच्यावर लक्ष ठेवत स्थानिकांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या काही नावांच्या साथीने मोठं होण्याचा मानस असल्याची बाब झी इंटरनॅशनल आणि झी५ चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित गोएंका यांनी स्पष्ट केलं. सेलकॉमशी जोडलं गेल्यामुळे त्याचा परिणाम झी5 त्या व्यवसायातही होताना दिसत असल्याची माहिती ZEE5 च्या अर्चना आनंद यांनी दिली.