Calcium Foods : कॅल्शियम कमी आहे? दूध-पनीर शिवाय या 10 पदार्थांनी हाडे होतील अधिक मजबूत

How To Get Calcium : तुमचे हाडे मजबूत नसतील तर तुम्हाला त्रास सहन करावा लागतो. कारण हाडांसाठी कॅल्शियमची गरज असते. तुमचा आहार योग्य नसेल तर कॅल्शियमची कमतरता जाणवते. केवळ दूध आणि पनीर घेणे नेहमीच आवश्यक नसते. तर दुग्धजन्य पदार्थाबरोबर काही पदार्थ खाण्यालाही प्राधान्य द्या. यातून तुम्हाला पुरेसे कॅल्शियम मिळते आणि तुमची हाडे मजबूत होतात.

सुरेंद्र गांगण | Updated: May 12, 2023, 02:18 PM IST
Calcium Foods : कॅल्शियम कमी आहे?  दूध-पनीर शिवाय या 10 पदार्थांनी हाडे होतील अधिक मजबूत title=

Calcium Rich Foods :  कॅल्शियमची कमतरता असेल तर हाडे ठिसूळ होतात. त्यामुळे तुम्ही पडला तर हाड मोडण्याचा धोका जास्त असतो. कारण हाडे ही मजबुत नसतात. कारण Calcium शरीरासाठी एक आवश्यक खनिज आहे. तुमच्या रक्तात असणारे कॅल्शियम नसांना काम करण्यासाठी सक्षम बनवतात. तसेच दुखापत झाल्यास रक्तस्त्राव थांबविण्यास मदत करते. जर तुमच्या शरीरात कॅल्शियम कमी असेल तर! आता तुम्ही याची चिंता करु नका. दूध, पनीर, दही इत्यादी दुग्धजन्य पदार्थाबरोबर काही पदार्थ खाल्ले तर कॅल्शिय अर्थात शरीरातील लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे दूध आणि पनीर या शिवाय हे पदार्थ खाण्यावर भर द्या. 

काहींना दूध आवडत नाही. त्यामुळे अशा दुग्धजन्य पदार्थांऐवजी इतर पदार्थ खाऊन देखील कॅल्शियम मिळू शकते. या वेगळ्या पदार्थांच्या सेवनानेही हाडांना खूप ताकद मिळते. तसेच फ्रॅक्चरचा धोका खूप कमी होतो. लक्षात ठेवा की कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अगदी किरकोळ दुखापत झाल्यास देखील हाडे कायमची मोडू शकतात. म्हणूनच तुम्ही शरीराला आवश्यक असलेले कॅल्शियम मिळण्यासाठी योग्य पदार्थांचे सेवन केले पाहिजे.  जाणून घ्या हे कोणते पदार्थ आहे.

कॅल्शियम मिळवण्यासाठी तुम्ही दुधाऐवजी चिया बिया खाऊ शकता. यामध्ये दुधापेक्षा 5 पट जास्त कॅल्शियम असते. USDA च्या डेटामध्ये दिसलेल्या आकड्यांवरुन अशी माहिती मिळते की, 100 ग्रॅम चिया बियामधून 631 मिलीग्रॅम कॅल्शियम प्रदान मिळते. तर 100 मिलीग्रॅम दुधात फक्त 123 मिलीग्रॅम कॅल्शियम असते.

तसेच बदाम खाल्ल्यामुळे कॅल्शियम आणि प्रोटीन मिळते. त्यामुळे तुम्ही बदामाचे सेवन करु शकता. रोज काही बदाम खाल्ल्याने भरपूर कॅल्शियम मिळते. 100 ग्रॅम बदामाच्या दाण्यामध्ये सुमारे 269 मिलीग्रॅम इतके कॅल्शियमचे पोषक तत्व असते.

 कॅल्शियमची कमतरता भरुन काढण्यासाठी रताळे खाणे आवश्यक आहे. रताळ्यात मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम मिळते. यामधून पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी देखील मिळते. जे हाडांव्यतिरिक्त डोळे, त्वचा, केस आणि रोगप्रतिकार शक्तीसाठी चांगले असते. एका मोठ्या रताळ्यामध्ये सुमारे 68 मिलीग्राम कॅल्शियम मिळते.

भेंडी खाणे चांगले असते. भेंडीतूनही कॅल्शिअम चांगले मिळते. एक कप भेंडीमध्ये 82 ग्रॅम कॅल्शियम असते. ज्यामुळे हाडे मजबूत होऊ शकतात. कांदे आणि मसाले घालून तुम्ही भेंडीची चविष्ट भाजी बनवू शकता. कॅल्शियम वाढीसाठी  हिरव्या पालेभाज्या खाणे आवश्यक आहे. आरोग्यासाठी पालक सारख्या हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो.

तसेच या पदार्थांमधून सुद्धा कॅल्शियम मिळते. ब्रोकोली, संत्री, तीळ, वाळवलेले अंजीर, व्हाईट बीन्स आणि सूर्यफूलाच्या बिया यातून आपल्या शरीराला हवे असलेले कॅल्शिअम मिळते. हे फूड सुद्धा कॅल्शियमने परिपूर्ण मानले जातात. त्यामुळे हे फुड नेहमी आपल्या आहारात घेतले पाहिजे.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)