How Much Does a Soul Weigh : एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की, त्याच्या शरीरातून आत्मा निघून जातो, असं म्हणतात. मात्र माणसाच्या शरीरात आत्मा असतो का? मृत्यूनंतर त्याचं काय होतं? असे असंख्य प्रश्न आहेत, ज्यांची उत्तर अजून समोर आलेली नाहीत. मात्र नुकतंच संशोधकांनी एक संशोधन केलं आहे. या संशोधनानुसार, तज्ज्ञांनी आत्म्याच्या वजनाची माहिती मिळवली आहे.
आतापर्यंत तुम्ही पशु-पक्षी किंवा किटक यांच्यावर संशोधन झालेलं पाहिलं असेल. मात्र तुम्ही कधी आत्म्यांवर झालेलं संशोधनाबाबत ऐकलंय का? अमेरिकेतील एक संशोधकाने आत्म्याचं वजन किती असतं, याबाबत संशोधन केलं. हे संशोधन करण्यासाठी या वैज्ञानिकाने मरणासन्न अवस्थेत असलेल्या लोकांचं संधोधन करण्यास सुरुवात केली.
मरणासन्न अवस्थेतील लोकांवर वैज्ञानिकांनी संशोधन केलं कारण ते, आत्म्याचं वजन जाणून घेऊ शकतील. यावेळी प्रत्येक व्यक्तीचं वजन वेगळं होतं. यावरून शास्त्रज्ञांना आत्मा खरोखर अस्तित्वात आहे की नाही, हे जाणून घेण्यास मदत झाली.
1907 साली अमेरिकेत एक वैज्ञानिक डॉ. डंकन मॅगडॉगल यांनी आत्म्याचं वजन मोजण्यासाठी एक प्रयोग केला. हा प्रयोग करण्यासाठी डॉ. डंकन यांनी अशा लोकांचं वजन केलं, ज्यांचा काही वेळातच मृत्यू होणार आहे. जेणेकरून डॉ. डंकन मृत्यूनंतर त्यांचं वजन तपासतील. जर त्यांचं वजन कमी झालं असेल तर डॉ. डंकन यांना व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याचं वजन किती असतं, याची माहिती मिळाली.
पहिल्या एका रूग्णामध्ये डॉ. मॅकडॉगल यांना असं आढळून आलं की, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं 21 ग्रॅम वजन कमी झालेलं. मृत्यूनंतर इतर रुग्णाचं वजनही कमी झालेलं दिसून आलं. मात्र काही काळानंतर त्याचं वजन पुन्हा एकदा तसंच वाढलेलं होतं, जसं पूर्वीचं नोंदवण्यात आलं होतं.
डॉ. डंकन यांनी हा प्रयोग आणखी काही व्यक्तींवर केला होता. या व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांच्या वजनातही घट दिसून आली. मात्र काही काळानंतर तर व्यक्तींचं वजन पूर्वीपेक्षा अधिक वाढल्याचं तज्ज्ञांच्या लक्षात आलं. यावेळी एका रुग्णाच्या मृत्यूच्या एका मिनिटानंतर त्याचं वजन 28 ग्रॅमने कमी झालेलं दिसून आलं. त्यानुसार, तज्ज्ञांनी एकंदरीत आत्म्याच्या अंदाज लावला.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, मृत्यूनंतर शरीरात अनेक बदल होतात. कदाचित हेच कारण शरीरातील वजनही कमी-जास्त होण्यामागे कारणीभूत असल्याचं दिसून आलं. याशिवाय रक्त गोठणं, फुफ्फुसातून शेवटच्या श्वासोच्छवासातून बाहेर येणं, इतर केमिकल रिएक्शन यामुळे वजनात घट झालं होतं. मात्र या संशोधनाची माहिती सरकारला मिळाल्यावर त्यांनी यावर बंदी आणली.