Health Tips News In Marathi : सध्या हिवाळा हंगामा सुरु आहे. या हंगामात शक्यतो सर्दी, खोकला ताप या आजारांना सामोरे जावे लागते. या हंगामात फ्लूचा कहर वाढतो आणि लोक व्हायरल इन्फेक्शनचे बळी होतात. सर्दी, खोकला आणि विषाणूजन्य ताप आल्यास लोक पॅरासिटामॉल, पेनकिलर आणि अनेक अँटीबायोटिक्स घेऊ लागतात. स्वत:च्या उपचारांमुळे अनेकांची प्रकृती खालावली जाते. अशा परिस्थितीत आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय औषध नियामक मंडळाने (Central Drugs Standard Control Organization) महत्त्वाचा निर्णय घेतला असून सर्दी-खोकला आणि पेनकिलरसाठी डॉक्टरांकडून दिल्या जाणाऱ्या तीन औषधांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे.
डोके आणि शरीराच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी अनेकदा डॉक्टरांकडून सौम्य वेदनाशामक औषधे दिली जातात. वाहणारे नाक, शिंका येणे आणि खोकला असल्यास सेटीरिझिन सारखी अँटी-हिस्टामाइन औषधे दिली जातात. रुग्णांना फ्लूच्या लक्षणांनुसार औषधे दिली जातात. कोरोनाव्हायरससह बहुतेक व्हायरल फ्लूचा उपचार केवळ लक्षणाच्या आधारे उपचार केले जातात. मात्र ही औषध किती वेळा घेतली तर ते घातक ठरु शकत नाही, हे पाहणं देखील तितकचं महत्त्वाचे आहे.
खोकला आणि सर्दीसाठी दिल्या जाणाऱ्या औषधांची पुन्हा तपासणी करण्यासाठी नवीन चाचणी घेण्याच्या सूचना केंद्रीय औषध नियामक मंडळाने दिल्या आहेत. यामध्ये पॅरासिटामॉल (अँटीपायरेटिक), फेनिलेफ्रिन हायड्रोक्लोराइड (सर्दी-खोकल्याचे औषध) आणि कॅफीन एनहायड्रस ( प्रोसेस्ड आणि कॅफिन असलेले) या औषधांचा समावेश आहे. इतर औषधांमध्ये कॅफीन एनहायड्रस, पॅरासिटामॉल, हायड्रोक्लोराइड आणि क्लोरफेनिरामाइन मॅलेट (अंटी एलर्जी) यांचा समावेश आहे.
केंद्रीय औषध नियामक मंडळाने सर्दी-खोकला आणि पेनकिलरसाठी औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना याचा प्रभाव आणि सुरक्षेतेसाठी चाचणी करण्यासाठी याच्या नव्याने ट्रायल घेण्याचे निर्देश दिले आहेत. नेहमी सर्दी-खोकल्यानंतर हीच औषधे दिली जातात. याशिवाय, पेनकिलरचा देखील निश्चित डोस संयोजन (FDCs) मध्ये समावेश आहे. हीच औषधे 30 वर्षांहून अधिक काळ विकली जात आहेत. जेव्हा दोन किंवा अधिक औषधे एकच डोस देण्यासाठी एकत्र केली जातात, तेव्हा त्याला फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन असे म्हणतात.
तसेच शरीरातील वेदनेसाठी दिल्या जाणाऱ्या औषधांच्या बाबतीत समितीने काहीशी संयत भूमिका घेतली आहे. यामध्ये सौम्य ते मध्यम डोकेदुखीसाठी औषधे बनविण्यास व विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये ही महत्त्वाचे म्हणजे हा डोस पाच ते सात दिवसांपेक्षा अधिक नसला पाहिजे. औषध नियामक मंडळाचा हा आदेश 1988 च्या काही औषधांची तपासणी करण्यासाठी 2021 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या तज्ञ समितीच्या माहितीच्या आधारे देण्यात आला आहे. औषध निर्मिती आणि विक्रीसाठी परवाना प्राधिकरणाकडून रीतसर मान्यता देण्यात आली नसल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, एफडीसी म्हणजेच एकाच वेळी एकापेक्षा जास्त औषधे देणे, जेव्हा जास्त परिणाम होण्याची शक्यता असते तेव्हाच योग्य मानले जाते. तसेच जर औषधाचा परिणाम टाळला गेला किंवा औषधाचा प्रभाव कमी झाला तर. इंडियन जर्नल ऑफ फार्माकोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे फार्माकोलॉजीचे माजी प्रमुख डॉ. वाय.के. गुप्ता आणि डॉ. सुंगती एस रामचंद्र यांनी भारतात उपलब्ध फार्माकोलॉजीची 'द गुड, द बॅड अँड अग्ली' या तीन विभागणी केली आहे.