मुंबई : प्रत्येक मुलीचे आपल्या पार्टनरबद्दल काही स्वप्नं असते. अशावेळी मनातील सर्वच इच्छा पार्टनरला बोलून दाखवल्या जात नाहीत. त्या न सांगता त्याला समजाव्या अशी मुलींची इच्छा असते. जर तुम्हाला ही कला अवगत असेल तर कोणतीही मुलगी तुमची फॅन होईल. तुमच्यात जर हे ५ गुण असतील तर तुम्ही मुलीचे मन अगदी सहज जिंकू शकता...
एकत्र जेवणाची मज्जा काही औरच असते. कोणत्याही मुलीला आपल्या पार्टनरसोबत क्वालिटी टाईम घालवायला आवडतो. त्यामुळे एकत्र जेवणे करणे मुलींना आवडते.
मुलगी कितीका स्मार्ट असेना पण आपल्या पार्टनरसोबत असताना लहान मुलींसारखे वागणे, दंगा मस्ती करणे तिला आवडते. तिच्या लहान सहान गोष्टी समजून घेतलेल्या तिला भावतात. तिचा अल्लडपणा, बालिशपणा समजून घेणारा पार्टनर तिला हवा असतो.
मुलींना सरप्राईज आवडतात. वेळोवेळी सरप्राईजेस देणारा पार्टनर मुलींना भावतो.
घरकामात मदत करणारा पार्टनर प्रत्येक मुलीला हवा असतो. न सांगता घरातील लहान सहान कामात मदत केल्याने मुलींच्या मनात आदरभाव निर्माण होतो.
प्रत्येक मुलीला आपल्या पालकांचा आदर करणारा मुलग आवडतो. मुलांचा हा अॅटीट्यूड कोणत्याही मुलीचे मन जिंकू शकतो.