Bad Habits : जेवल्यावर लगेच लघवीला जाताय, हृदयासह 'या' समस्याही होतील दूर

Toilet After Eating : जेवल्यानंतर लगेच टॉयलेटला जावं लागतं, ही सवय हेल्दी की अनहेल्दी सवय असल्याची चर्चा होत असताना डॉक्टरांचा व्हिडीओ     

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 2, 2023, 05:45 PM IST
Bad Habits : जेवल्यावर लगेच लघवीला जाताय, हृदयासह 'या' समस्याही होतील दूर  title=

Best Habits After Eating : काही लोकांना जेवल्याबरोबर टॉयलेट अथवा लघवीला जाण्याची सवय असते. तज्ज्ञांचे असे मत आहे की, हे लक्षण सूचित करते की त्या लोकांची पचनशक्ती खराब आहे. पण जेवल्यानंतर लगेच शौचालयात जाणे देखील फायदेशीर ठरू शकते. पण जेवल्यानंतर लघवी करणे देखील फायदेशीर ठरु शकते. आयुर्वेदिक डॉक्टर वैद्य मिहीर खत्री यांनी ही माहिती दिली आहे.

जेवल्यानंतर करा हे काम 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr.Khatri's Shashwat Ayurvedam (@vaidya_mihir_khatri)

जेवल्यानंतर लगेच करा लघवी

आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही जेंव्हा जेवता तेंव्हा जेवल्यानंतर लगेच लघवी करावी. यामुळे किडनी निरोगी राहते आणि संबंधित आजारांपासून बचाव होतो. ही सवय तुमच्या हृदयासाठी देखील फायदेशीर ठरू शकते आणि हृदयाच्या सर्व आजारांचा धोका खूप कमी होईल.

डाव्या कुशीवर झोपावे 

डाव्या बाजूला झोपण्याला वामा कुक्षी म्हणतात. आयुर्वेदात जेवल्यानंतर या बाजूला झोपायला सांगितले आहे. असे केल्याने अन्नाचे पचन चांगले होते आणि पोटाचा त्रास होत नाही. त्यामुळे ही सवय अंगीकारली पाहिजे. आयुर्वेदिक डॉक्टरांव्यतिरिक्त, अनेक संशोधकांचे असेही मत आहे की डाव्या बाजूला झोपल्याने छातीत जळजळ होण्याची समस्या कमी होते. या स्थितीत, अन्न आतड्यांमधून सहज जाते आणि पाचन विकार टाळले जातात.

जेवल्यानंतर हे करु नका 

एक्सरसाइज करू नका
कॅफीन घेणे
खूप पाणी पिणे
दात घासत नाही
नंतर लगेच शॉवर

लगेच शौच्छाला का होते?

अन्नापासून बनविलेले टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी, संपूर्ण आहार शरीरात गेल्यावर वायू निर्माण होतो. आतड्यांमधील हालचाल इतकी तीव्र वेगाने होते की, संपूर्ण अन्ननलिका मध्ये हालचाल होते. यानंतर त्या व्यक्तीला शौच करण्याची तीव्र इच्छा जाणवते. त्यामुळे हा कचरा कोलनपर्यंत 8 मीटरचा प्रवास करून बाहेर पडतो. ही नैसर्गिकरित्या सामान्य प्रक्रिया आहे परंतु काही लोकांमध्ये हे प्रतिक्षेप खूप सक्रिय होते. त्यामुळे अन्न खाल्ल्यानंतर पोटात अतिसंवेदनशील हालचाल वाढते आणि व्यक्तीला ताबडतोब शौचास जावे लागते.