पेनकिलरमुळे भारतातील 7% लोकांची किडनी निकामी, AIIMS चा धक्कादायक अहवाल

world kidney day : अंगदुखी, डोक दुखी, ताप येणे असा अनेक आजारांवर पेनकिलरसारख्या गोळ्या घेत असतो. पण या पेनकिलरच्या गोळ्याचे प्रमाण वाढले की त्याचा परिणान किडनीवर दिसून येतो. याचबाबतीत  AIIMS ने धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Mar 14, 2024, 04:39 PM IST
पेनकिलरमुळे भारतातील 7%  लोकांची किडनी निकामी, AIIMS चा धक्कादायक अहवाल title=

world kidney day 2024 news in Marathi: शरीरातील वेदना, ताप, डोकेदुखी या सारख्या आजारांवर लगेच केमिस्टकडून पेनकिलरची औषध खातो. पेनकिलर औषधे तात्पुरता स्वरुपात शरीरातील वेदना, ताप आणि जळजळ कमी करते. या औषधांमुळे फरक तर नक्कीच जाणवतो. मात्र या औषधांचे प्रमाण अति झाल्यावर आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम दिसू लागतात. याचदरम्यान AIIMS ने एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामध्ये भारतातील 7 टक्के लोकांची पेनकिलरमुळे किडणी निकामी झाल्याचा दावा केला आहे. 

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच एम्स ने अहवालात म्हटलं की, पेनकिलर औषध अधूमधून घेतल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होत नाही. मात्र त्याचे प्रमाण वाढले तर नक्कीच किडणीवर गंभीर नुकसान होऊ शकते. वृद्ध, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसारख्या उच्च-जोखीम असलेल्या व्यक्तींमध्ये हा धोका अधिक असतो. अधूनमधून पेनकिलरची औषधांचा वापर करुन त्यांची किडनी खराब होऊ शकते. 

अनेकदा वेदना आणि जळजळ कमी कमी करण्यासाठी पेनकिलरची औषध प्रिस्क्रिप्शनशिवाय विकले जातात. यामध्ये नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स जसे की ibuprofen, diclofenac, naproxen यांचा समावेश आहे. एस्पिरिन, अॅसिटामिनोफेन आणि कॅफीनसह औषधे यांचे संयोजन देखील सहजपणे उपलब्ध आहेत. परिणामी ही औषध डोकेदुखी आणि पाठदुखीसाठी घेतलीच जातात. पेन किलरमुळे अनेक प्रकारे किडनीचे नुकलान होऊ शकते. 

पेनकिलरमुळे होणारे नुकसान

पेनकिलरमुळे शरीरात पोटॅशियमची पातळी वाढू शकते. बहुतेक रुग्ण किडनीच्या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे नसलेले राहतात आणि वाढलेले क्रिएटिनिन एक आनुषंगिक शोध आहे. यामध्ये श्वास घेण्यास अडथळे, उलट्या येणे, भूक न लागणे आणि संपूर्ण शरीरावर सूज येऊ शकते. 

किडनी निरोगी ठेवण्यासाठी उपाय 

हर्बल सप्लीमेंट कमी करा

व्हिटामिन पूरक आहार किंवा हर्बल पूरक पदार्थांचे  सेवन केल्यास मूत्रपिंडाचे नुकलान होऊ शकते. म्हणून या गोष्टी वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या...

व्यायाम

नियमितपणे तुम्ही शारीरिक हालचाली करत राहिल्याल, तुमचे वजनही नियंत्रणाखाली राहिल आणि उच्च रक्तदाबाची कोणतीही समस्या उद्भवणार नाही. 

निरोगी आहार घ्या

उच्च रक्तदाब,  मधुमेह, ह्रदयविकार यासारख्या आजारांमुळे किडनीचे आजार उद्भवतात. म्हणूनच निरोगी आहार खाणे फार महत्त्वाचे आहे.