आठवड्यातून एकदा फणस खाल्यामुळे होतात हे 5 फायदे

खूप कमी लोकं असतील ज्यांना फणसाची मसालेदार भाजी आवडत नसेल. काही जण फणसाचा फळ समजतात तर काही भाजी. तर अनेक जण फणसाच्या भाजीला नॉनव्हेजकरता ऑप्शन म्हणून देखील समजतात. काही घरांमध्ये फणसाची भाजी तर होतेच तर काही जण याचं लोणचं, भजी आणि कोफ्ता देखील करतात. काहींना पिकलेला फणस देखील आवडतो. 

आठवड्यातून एकदा फणस खाल्यामुळे होतात हे 5 फायदे  title=

मुंबई : खूप कमी लोकं असतील ज्यांना फणसाची मसालेदार भाजी आवडत नसेल. काही जण फणसाचा फळ समजतात तर काही भाजी. तर अनेक जण फणसाच्या भाजीला नॉनव्हेजकरता ऑप्शन म्हणून देखील समजतात. काही घरांमध्ये फणसाची भाजी तर होतेच तर काही जण याचं लोणचं, भजी आणि कोफ्ता देखील करतात. काहींना पिकलेला फणस देखील आवडतो. 

फणस हा औषधीय गुणांनी भरलेलं पौष्टिक फळ  

फणसामध्ये विटामिन A, विटामिन C, थायमिन, पोटॅशिअम, कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, आयरन, नियासिन आणि जिंक भरपूर प्रमाणात असते. फणस हे फळ फायबरचे उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे फणस हे फळ अतिशय गुणकारी आहे. 

डोळ्यांना अतिशय फायदेशीर 

जर तुम्हाला पिकलेला फणस खाणं अतिशय आवडतं तर त्यातील गरे काढून पाण्यात उकळून ते प्या. असं केल्यामुले शरीरात एक प्रकारे उत्साह राहतो. फणसात विटामीन ए असल्यामुळे डोळ्यांना यामुळे अतिशय फायदा होतो. आणि त्वचा अतिशय चांगली होते. 

हृदय निरोगी राहण्यास होते मदत 

फणसात कॅलरीज नसतात. त्यामुळे फणस खाल्याने हृदयाशी जोडल्या गेलेल्या सगळ्या समस्यांवर याचा फायदा होतो. यामध्ये पोटॅशिअम देखील जास्त प्रमाणात असते. त्यामुळे हृदय रोगासारख्या समस्या दूर ठेवण्यास फणस मदत करते. यामुळे हाय ब्लड प्रेशर देखील कमी होते. 

हाडांच्या दुखण्यापासून मिळतो आराम 

फणसाच्या गऱ्याशेजारी असलेल्या सफेद भागाचं दूध काढलं. आणि ते सूज असलेल्या किंवा कापलेल्या भागावर लावल्यास फायदा होतो. तसेच हाडांच्या दुखण्यावरही फणसाचा अधिक गुणकारी उपाय आहे.

पचनशक्ती उत्तम होते 

फणसाचे सेवन केल्यामुळे अल्सर आणि पचनाच्या सर्व समस्या दूर होतात. फणसाच्या पानापासून बनलेल्या चुरणाचा सर्वाधिक फायदा होतो. अल्सरच्या आजाराकरता फणसाची पानं सुकवून खाणं अधिक फायदेशीर 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x