पुणेकर खरंच म्हणतात, दुपारची झोप घेणे आरोग्यासाठी लाभदायक, वामकुक्षी घेण्याचे 'हे' फायदे वाचून थक्क व्हाल!

Afternoon Sleeping Benefits: दुपारी झोप घेण्याचे तोटे तुम्ही ऐकले असतीलच. पण खरं तर दुपारी झोपल्याने शरीराला फायदाच होतो. जाणून घेऊया. 

Updated: Sep 5, 2023, 06:04 PM IST
पुणेकर खरंच म्हणतात, दुपारची झोप घेणे आरोग्यासाठी लाभदायक, वामकुक्षी घेण्याचे 'हे' फायदे वाचून थक्क व्हाल! title=

Health Benefits Of Afternoon Naps In Marathi: 1 ते 4ची वेळ म्हटलं की पुणेकरांसाठी ती वामकुक्षीची वेळ असते. अनेकदा पुणेकऱ्यांना यावरुन ट्रोलही केलं जायचं. मात्र, पुणेकरांची ही सवय खरंच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दुपारची झोप घेण्याचे अनेक फायदे आहेत. रात्री कितीही झोप घेतली तरी दुपारी जेवल्यानंतर झोप येते. दुपारची झोप घेणे हे अनेकांना आवडते मात्र कामाच्या नादात झोप घेणे अनेकांना जमत नाही. मात्र, आज जाणून घ्या दुपारची झोप घेण्याचे फायदे व नुकसान दोन्हीही.

दुपारी झोप घेण्याचे नुकसान

डॉ. वारालक्ष्मी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, आयुर्वेदानुसार दुपारी झोप घेणे नुकसानदायक आहे. जेवल्यानंतर लगेचच झोपण्याची चुक करा नका त्यामुळं पाचनसंस्था कमजोर होते. 

दुपारी झोप घेण्याचे फायदे

दुपारी थोडा वेळ झोप घेतल्यास स्मरणशक्ती चांगली राहते. त्याचबरोबर एकाग्रतादेखील वाढते. अनेकदा आपल्या डोक्यात अनेक विचार सुरू असतात. त्यामुळं दुपारी झोपल्यामुळं या डोक्याला आराम मिळतो व मध्यल्या काळातील अनावश्यक माहिती वेगळी केली जाते. 

दुपारी 1 ते 3 या वेळेत अर्धा तास झोप घेतल्यास शरीराला त्याचा फायदा होतो. चिडचिडेपणा, मानसिक ताण कमी होऊन कामातील सतर्कता वाढते. उन्हाळ्याच्या दिवसांत दुपारी झोप घेतल्याने शरीराला आराम मिळतो. 

दिवसभरात थोडा वेळ झोपल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. दिवसा झोपल्याने हृदयाचे ठोके काही प्रमाणात मंदावतात. यामुळे हृदयविकार टाळता येतात. दुपारी झोप घेणे डोळ्यांसाठीही लाभदायक आहे. कामाच्या वेळी डोळ्यांवर ताण येतो अशा स्थितीत झोप घेतल्यास डोळ्यांवरील ताण कमी होऊ शकतो व डोळे कोरडे होण्याच्या समस्या टाळता येतात. 

दुपारी झोप घेतल्याने या लोकांना मिळतो फायदा

गरमीमुळं अशक्तपणा व थकवा आलेल्या लोकांना  दुपारची झोप घेणे फायद्याचे ठरते. तसंच, व्यायाम किंवा प्रवास केल्यानंतर दुपारची झोप घ्यावी. अॅनिमिया सारख्या आजाराने त्रस्त असलेले लोकं, ज्येष्ठ नागरिक आणि मुलं, अशक्त व्यक्तींनी दुपारी एक तास तरी झोप घ्यावी. अपचन, डायरिया किंवा कोलिकच्या कारणांमुळं त्रस्त असलेल्या लोकांनी देखील वामकुक्षी घेण्यास काही हरकत नाही.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)