मुंबई : चहा न आवडणारी फार कमी लोकं असतात. मात्र अनेकांना चहाच्या सेवनाने एसिडिटीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे जर तुम्हाला चहाच्या स्वरूपात काहीतरी निरोगी पिण्याची इच्छा असेल तर तुम्ही व्हाईट टी पर्याय म्हणून वापरू शकता. व्हाईट टी तुम्ही सहजरित्या घरात तयार करू शकता. व्हाईट टी हा अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे आणि आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
White Tea अनेक फायदे आहेत. त्यामुळे ज्या व्यक्तींना दररोज चहा पिणं पसंत आहे त्यांच्यासाठी White Tea हा एक चांगला पर्याय आहे. शिवाय हा हेल्दी लाईफस्टाईलसाठी खूप उपयुक्त आहे.
White Tea तुम्हाला हृदयांच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतो. यामध्ये Plant Based Molecules असतात जे तुमच्या शरीरात अँटीऑक्सिडंटच्या रूपात काम करतात. हे मॉलेक्यूल्स पॉलीफेनॉलचा एक प्रकार असतात. ज्याला Catechins म्हटलं जातं. हे तुमच्या हृदयासाठी चांगलं असतं.
पॉलीफेनॉल्स तुमच्या रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करतं आणि ब्लॉकेजला कमी करण्यास मदत करतं. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, दररोज व्हाईट टीच्या सेवनाने हृदयाच्या आजारांचा धोका 21 टक्क्यांनी कमी होतो.
शरीरातील फॅट बर्न करण्यासाठी व्हाईट टी एक चांगला पर्याय मानला जातो. यामध्ये कॅफेनची मात्रा असते आणि Epigallocatechin gallate नावाचं एक प्लांट बेस्ड कम्पाउंड समाविष्ट असतं. ज्यामुळे फॅट कमी होतं. जर तुम्ही रोज व्हाईट टीचं सेवन केलं तर मेटाबॉलिज्म मजबूत होऊन तुम्ही मोठ्या प्रमाणात कॅलरी बर्न करू शकता
अनेक अभ्यासातून हे स्पष्ट झालं आहे की, व्हाईट टीमध्ये असलेलं Polyphenols आणि Elastase त्वचेला डॅमेज करणाऱ्या घटकांसाठी फायदेशीर आहे. व्हाईट टीमुळे एजिंगमुळे लटकणाऱ्या त्वचेची समस्याही उद्भवत नाही. व्हाईट टी फायबर नेटवर्कचेॉं संरक्षण करण्यास मदत करते जेणेकरून आपली त्वचा निरोगी आणि कॉम्पॅक्ट राहील.
व्हाईट टीमध्ये असणारे मिनरल्स दातांना बॅक्टेरियापासून वाचवतात. यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज तसंच Fluoride, Catechin आणि Tannin सारखे मिनरल्स आढळतात. Fluoride दातांना कॅव्हिटीपासून दूर ठेवतात.