Pink Lips: कोणतेही महागडे प्रोडक्टस न वापरता, फक्त घरगुती उपाय करत घालवा ओठांवरचा काळेपणा

Olive Oil नं च्या मदतीनं ओठ कशा कशा प्रकारे करता येतील गुलाबी... सगळ्यांना आवडणाऱ्या गुलाबी लिप्ससाठी घरगुती उपाय

Updated: Dec 21, 2022, 06:44 PM IST
Pink Lips: कोणतेही महागडे प्रोडक्टस न वापरता, फक्त घरगुती उपाय करत घालवा ओठांवरचा काळेपणा  title=

Olive Oil for Pink Lips : आपल्या सगळ्यांना माहित आहे की त्वचेच्या रंगा (Skin Tone) प्रमाणे आपल्या ओठांचा रंग असतो. तर अनेकांचा रंग हा गोरा असला तरी त्यांच्या ओठांचा रंग हा काळा असतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक विविध प्रकारचे प्रोड्क्ट वापरतात. ही सौंदर्य उत्पादने सहसा खूप महाग असतात. (Lip Lightener) या प्रोडक्ट्सच्या वापरानं ओठांचा काळेपणा काही काळासाठी लपून राहतो, पण कधी-कधी या गोष्टी आपले नुकसान करू लागतात. ओठ काळे होण्याची समस्या धुम्रपान, धूळ आणि प्रदूषणामुळे होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. अनेक लोकांमध्ये ही समस्या कमी पाणी पिण्यामुळे उद्भवते. याशिवाय ओठांची निगा राखणारी उत्पादनेही यासाठी कारणीभूत ठरू शकतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही या घरगुती उपाय वापरू शकता. हे तुम्हाला निरोगी आणि गुलाबी ओठ देईल. (Lips Get Dark Because Of Pollution, dust, smokeing)

अशा प्रकारे ओठांचा काळेपणा करा दूर (Olive Oil Benifits For Pink Lips) 

1. प्रत्येक व्यक्तीला ऑलिव्ह ऑइलशी माहित आहे. आरोग्य तज्ञ सांगतात की ऑलिव्ह ऑइलमुळे काळ्या ओठांच्या समस्येपासून सुटका मिळते. तुम्हाला फक्त ऑलिव्ह ऑईल मधात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर लावायचे आहे. 

2. साखर आणि ऑलिव्ह देखील ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी खूप प्रभावी ठरतात. तुम्हाला फक्त ऑलिव्ह ऑईलमध्ये साखरेची पावडर मिसळून ओठांवर लावायची आहे. असे केल्याने ओठांचा काळेपणा दूर होईल.

हेही वाचा : Oops Moment : कार्यक्रमा सुरु असताना Sonam Kapoor च्या ब्लाऊजचं बटन अचानक.... व्हिडिओ व्हायरल

3. अनेक प्रकारचे ब्यूटी प्रोडक्ट्स बनवण्यासाठी कोरफड किंवा एलोव्हेरा जेलचा वापर केला जातो. ऑलिव्ह ऑइलमध्ये एलोवेरा जेल मिक्स करून ओठांवर लावल्याने काळेपणा दूर होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ऑलिव्ह ऑइल ओठांना हायड्रेट ठेवते आणि ते मऊ बनवते. त्यामुळे आपल्या ओठांचा रंग हा गुलाबी देखील होतो. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)