महिलेला मासिक पाळीदरम्यान डोळ्यातून रक्तस्त्राव....पाहा काय आहे हा आजार?

मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. मात्र एक घटना अशी समोर आली आहे, ज्यामध्ये मासिक पाळीदरम्यान चक्क महिलेच्या डोळ्यातून रक्त येऊ लागले. ही घटना वाचून कुणीही चक्रावून जाईल. मात्र चंदीगडमधल्या एका महिलेला हा दुर्मिळ आजार झालेला आहे. 

Updated: Mar 25, 2021, 04:37 PM IST
महिलेला मासिक पाळीदरम्यान डोळ्यातून रक्तस्त्राव....पाहा काय आहे हा आजार? title=
प्रतिकात्मक फोटो

मुंबई : मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. मात्र एक घटना अशी समोर आली आहे, ज्यामध्ये मासिक पाळीदरम्यान चक्क महिलेच्या डोळ्यातून रक्त येऊ लागले. ही घटना वाचून कुणीही चक्रावून जाईल. मात्र चंदीगडमधल्या एका महिलेला हा दुर्मिळ आजार झालेला आहे. 

चंदीगडमधल्या एका 25 वर्षीय विवाहित महिलेच्या डोळ्यातून अचानक रक्त येऊ लागलं. त्यामुळे तिने रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी सर्व प्रकारच्या रेडिओलॉजीकल आणि ऑप्थेल्मोलॉजिकल चाचण्या केल्या. मात्र यामागचे कारण लक्षात येत नव्हते. 

अखेर या महिलेला मासिक पाळीदरम्यान रक्ताचे अश्रू येत असल्याचे लक्षात आले. या महिलेला ऑक्युलर व्हिकॅरियस मेंस्ट्रुएशन (ocular vicarious menstruation) हा अत्यंत दुर्मिळ आजार झालाय. 

'या' आजारात नेमका काय त्रास होतो?

मासिक पाळीदरम्यान पोट, पाठ दुखणं, चिडचिडेपणा, थकवा, भूक मरणं अशा समस्या साधारणतः येतात. 
मात्र काही वेळा चंदिगडच्या या महिलेसारखी वेगळी लक्षणे आढळू शकतात. यामध्ये डोळे, कान, नाक, नखं इथून रक्तस्त्राव होण्याची भीती असते. 

एका ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये या आजारावर एक लेख आला होता. त्याआधारे डॉक्टरांनी महिलेला 3 महिने ओरल काँट्रासेप्टिव्ह्ज दिले. त्यानंतर दर मासिक पाळीदरम्यान होणारा हा त्रास बंद झाला. 

यापूर्वी 2014 आणि 2016 मध्ये ऑक्युलर व्हिकॅरियस मेंस्टुरेशनच्या केसेस आढळून आल्या होत्या. त्यानंतर आता चंदिगडच्या या महिलेला हा आजार झाल्याचे आढळून आळलंय. सध्या तरी 3 महिन्यांची प्रदीर्घ ट्रीटमेंट हाच यावर उपाय आहे.