Soft Waxing: घरच्या घरी पायावरचे, हातावरचे केस कसे काढाल?; जाणून घ्या सोप्या टीप्स

Hair Removing: महिलावर्ग हा ब्यूटी कॉन्शियस असतो. मेकअप आणि कॉस्मेटिक्सच्या (Cosmetics) बाबतीत खासकरून तरूण आणि नोकरी करणाऱ्या महिला या खूप जागरूक असतात. ऑफिसची मिटिंग असो, किंवा कुठलंही सेलिब्रेशन असो आपल्या अगदी टॉप टू बॉटम सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यात एक सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे वॅक्सिंग. 

Updated: Jan 1, 2023, 05:18 PM IST
 Soft Waxing: घरच्या घरी पायावरचे, हातावरचे केस कसे काढाल?; जाणून घ्या सोप्या टीप्स  title=

Hair Removing: महिलावर्ग हा ब्यूटी कॉन्शियस असतो. मेकअप आणि कॉस्मेटिक्सच्या (Cosmetics) बाबतीत खासकरून तरूण आणि नोकरी करणाऱ्या महिला या खूप जागरूक असतात. ऑफिसची मिटिंग असो, किंवा कुठलंही सेलिब्रेशन असो आपल्या अगदी टॉप टू बॉटम सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यात एक सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे वॅक्सिंग. हेअर रिम्हुविंग क्रिम्स (Hair Removing Creams) नाहीतर पार्लरमध्ये जाऊन महागडी ट्रिटमेंटही करून घेतो. परंतु सारखं सारखं बाहेरची महागडी ट्रीटमेंट (Body Wax Treatment  Near Me) करून घेणंही आपल्याला परवडतं नाही. त्याचसोबत घरगूती उपायांवरही आपल्याला कधी लक्ष देता येत नाही. परंतु हल्ली अनेक तरूणी नोकरीच्या कामातून वेळ काढून हल्ली सगळे घरीच वेक्सिंग करताना दिसतात. घरगुती वॅक्सिंग करणं सध्या सर्वांनाच सोप्पं झालं आहे. तेव्हा जाणून घेऊया या तुम्ही सोप्प्या पद्धतींनी तुम्ही बॉडी वॅक्सिंग घरच्या घरी कसे करू शकता. (body waxing these are the easy steps of body waxing at home know more)

अनेक महिला आपल्या शरीरावरचे नको असलेले केस काढून टाकण्यासाठी ते वॅक्सिंग (body waxing easy steps) करून घेतात. त्यामुळे आपल्याला खूप चांगली गुळगुळीत आणि सॉफ्ट त्वचा मिळते. बॉलिवूड अभिनेत्रींची सॉफ्ट स्किन पाहून आपल्यालाही वाटतं की आपलीही अशीच स्किन हवी अशी अपेक्षा असते. तेव्हा जाणून घ्या तुम्हीही घरच्या घरी त्यांच्यासारखीच सॉफ्ट आणि सुंदर त्वचा मिळवू शकता. तुम्ही घरच्या घरी सॉफ्ट वॅक्सिंगमधून तुम्ही चांगली आणि गुळगुळीत त्वचा मिळवून शकता. यामुळे हात, पाय, बगल आणि कंबर यांसारख्या शरीराच्या भागांतून आपण शरीरावर केस काढू शकतो. तेव्हा जाणून घेऊया सॉफ्ट वॅक्सिंगचे सुपर फायदे

घरच्या घरी सॉफ्ट वॅक्सिंग कसे बनवायचे? 

होममेड सॉफ्ट वॅक्सिंग बनवणं खूप सोप्पं आहे. होममेड सॉफ्ट मेण बनवणे खूप सोपे आहे. खाली नमूद केलेल्या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही हे मेण बनवू शकता. यासाठी 1 कप पाढंरी साखर (पिठीची नाही तर दाण्याची), 1 टीस्पून लिंबाचा रस, 1/4 कप मध, 1 टीस्पून पाणी असे साहित्य घ्यावे. त्यानंतर सर्वप्रथम एका भांड्यात साखऱ आणि पाणी घालून मंद आचेवर ठेवा. त्यानंतर साखर विरघळल्यानंतर त्यात लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण असेच ढवळा आणि त्यानंतर थोडं घट्ट होऊ लागले की त्यानंतर गॅस बंद करा. त्यानंतर तुम्हाला जर हे मिश्रण जड वाटतं असेल तर त्यात थोडं पाणी मिसळा. 

वापरावे कसे? 

हे मिश्रण तुम्ही हात, पाय आणि कंबरेवर लावू शकता. हे मिश्रण तुम्ही हळूच तुमच्या त्वचेला लावा, हे मिश्रण गरम असल्यानं त्वचे जळणार नाही याची काळजी घ्या. स्पॅटुलाच्या (Spatula) मदतीनं हे मिश्रण हळूच तुमच्या त्वेचवर पसरवा. ज्या ठिकाणी जास्त केस असतील तिथे हे मिश्रण हळूहळू लावा. या मिश्रणावर मग वॅक्सिंग स्ट्रीप ठेवा आणि त्याला थोडं दाबा आणि मग पटकन ओढून त्वचेपासून वेगळं करा. सॉफ्ट वॅक्सिंग करताना तुम्हाला वेदना होऊ शकतात. परंतु त्याचा जास्त वापर करू नका त्यानं त्वचेचं नुकसान होऊ शकते. 

वॅक्सिंगचे फायदे (waxing benefits)

आपण मऊ वॅक्सिंगचा वापर करून हात, पाय आणि कंबर येथल्या भागातून केस काढू शकतो. हार्ड वॅक्सिंगपेक्षा सॉफ्ट वॅक्सिंग (Hard Waxing Vs Soft Waxing) सोप्पं असतं. तुम्ही त्याचा वापर कधीही आणि कुठेही करू शकता. वॅक्सिंग केल्यानं त्वचा मुलायम होते. यासोबतही स्किनला (Skin) ग्लोही येतो. या वॅक्सिंगमुळे तुमच्या त्वचेवरील मृत पेशी निघून जाण्यास मदत होते. शेव्हिंगच्या तुलनेत वॅक्सिंगमुळे पुन्हा केसांची वाढ कमी होते. त्यातून सॉफ्ट वॅक्सिंगमुळे कुठल्या कॅमिकल्सचाही त्वचेवर परिणाम होत नाही.