मुंबई :जस जस आपल वय वाढत जात तसतस शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच आपला मेंदू (Brain) देखील म्हातारा होतो. जेव्हा आपण 30 वर्षांचे असतो तेव्हा आपला मेंदू संकुचित होऊ लागतो. आणि वयाच्या 60ठीत ही प्रक्रिया आणखी वेगवान होते. त्यामुळे आपल्याला अनेक समस्या उद्भवतात. जसे की गोष्टी लक्षात न राहणे, कोणाच्याही मदतीशिवाय काम पूर्ण न होणे, लक्ष न लागणे. अशा स्थितीत आज आम्ही तुम्हाला अशाच काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला सांगतात की तुमचा मेंदू म्हातारा होऊ लागला आहे. चला जाणून घेऊया या.
जसजसे तुम्ही वयाचा 60 चा पल्ला ओलांडला, तसतसे तुमची स्मरणशक्ती कमी होऊ लागते. उदाहरण जसे की तुम्ही चाव्या कुठे सोडल्या होत्या हे विसरणे, पासवर्ड विसरणे किंवा मित्राचे नाव लक्षात ठेवण्यास त्रास होणे.
ब्रेन वॅल्यू कमी झाल्याने, पुढचा लोब आणि हिप्पोकॅम्पस शरीराच्या इतर भागांपेक्षा जास्त आकसतात. संज्ञानात्मक कार्ये योग्यरित्या कार्य करू शकत नसल्यामुळे, तुम्हाला गोष्टी समजून घेण्यात खूप अडचणींचा सामना करावा लागतो.
काही ठरवू न शकणे किंवा चुकीचे निर्णय घेणे ही अशी चिन्हे आहेत जी लोकांमध्ये स्मरणशक्ती कमजोर होण्याआधी दिसू लागतात.
तुमचा मेंदू (Brain Aging Signs) जसजसा मोठा होतो तसतसे मेंदूच्या कार्यपद्धतीत बदल होतो, ज्यामुळे तुमच्या भावनिक कार्यावरही परिणाम होतो. जसजसे तुमचे वय वाढत जाईल तसतसे तुम्हाला वारंवार मूड बदलण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.
जर तुम्हाला दृष्टीसंबंधी समस्या येत असतील तर हे देखील वृद्धत्वाचे लक्षण आहे.
मेंदू (Brain Aging Signs) म्हातारा झाल्यामुळे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. कारण वयानुसार चिंता आणि नैराश्याची समस्या सामान्य आहे.