उन्हाळ्यात ताकाच्या या ५ पर्यायांनी रहा रिफ्रेशिंग!

उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना काहीतरी थंड प्यावसे वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे. 

Updated: May 10, 2018, 09:14 AM IST
उन्हाळ्यात ताकाच्या या ५ पर्यायांनी रहा रिफ्रेशिंग! title=

मुंबई : उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना काहीतरी थंड प्यावसे वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे. अशावेळी कोल्डड्रिंक्स पिण्याचा मोह होतो. पण हा मोह आवरता घ्या. कारण कोल्डड्रिंक्सचे आरोग्यावर होणारे दुष्परिणामच अधिक आहेत. त्यामुळे उन्हाळा सुसह्य करण्यासाठी पोटाला, शरीराला थंडावा देणारे ताक हा उत्तम पर्याय ठरतो. त्यामुळे हेव्ही जेवणानंतर पोटाला थंडावा मिळतो. त्याचबरोबर पोट, अन्ननलिकेभोवती जमलेले फॅट्स कमी होण्यास मदत होते. अन्नपचन सुरळीत होते. रक्तदाब नियंत्रित होण्यास फायदेशीर ठरते. डिहायड्रेशनपासून बचाव होतो. त्यामुळे उन्हाळ्यात ताकाचे हे पर्याय ट्राय करा आणि रहा कूल...

मिरचीचे ताक:

दही हिरव्या मिरच्या आणि पाणी हे मिश्रण मिक्सरमध्ये एकत्र वाटा किंवा भांड्यात घुसळा. मिरचीचे ताक दाक्षिणात्य प्रदेशातील आवडती आणि प्रसिद्ध रेसिपी आहे. तसेच तिखट ताक आवडीने पिणाऱ्यांकरीता हा उत्तम पर्याय आहे.

मसाला ताक:

चवीसाठी आणि कमी तिखट किंवा चवीसाठी अर्धा कप दही, अर्धा चमचा जिरे पावडर, काळे मीठ आणि अर्धा कप पाणी हे मिश्रण एकत्र मिक्सरला लावा. त्यात तुम्ही बर्फाचे काही खडे आणि चवीसाठी काही पुदिन्याची पाने किंवा कोथिंबीरची पाने त्यात मिसळा. उन्हाळ्याच्या तळपत्या गरमीत ताजेतवाने करण्यासाठी हे ताक उत्तम पर्याय आहे.

जिरा ताक:

जिऱ्याची पावडर आणि खड्याचे मीठ ताकात मिसळा. सर्वात महत्वाचे म्हणजे ताकाला चव येण्यासाठी काहीसे पातळ किंवा हलके असावे. ताक चवदार करण्यासाठी पुदिन्याची पाने त्यात मिसळा.

पुदिना ताक:

हे ताक गुजरातमध्ये प्रसिद्ध आहे. ताक तयार करण्यासाठी त्यात वाटीभर पुदिन्याची पानं आणि त्यात ३०० मिली पाणी मिसळा. मिक्सरला लावण्याआधी त्यात बारीक चिरलेले आले आणि अर्धा चमचे जिरा पावडर मिसळा. हे ताक पिण्याआधी २० मिनिटे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवावे.

लिंबाचे ताक:

दोन चमचे दही घुसळुन घ्या. यामध्ये मिठाऐवजी एक चमचा लिंबाचा रस मिसळा. बाहेरतून थकून आल्यावरसुद्धा हे तयार लिंबाचे ताक पिण्यास घेऊ शकता.