मुंबई : चहा हे उत्तेजक पेय समजले जाते. मात्र वर्षाषुवर्ष अनेकांच्या दिवसाची सुरूवात वाफाळत्या चहानेच होतच असेल. चहा सोबत अनेक समज-गैरसमज समाजात पसरत आहेत. आजकाल फीगर कॉन्शियस झालेले अनेकजण दूधाच्या चहाऐवजी ग्रीन टी पिण्याकडे अधिक लक्ष देतात.
हेल्दी डाएट आणि व्यायामचं गणित सांभाळून बॉलिवूड सेलिब्रिटी करिना कपूरला 'झिरो फिगर' मिळवून देण्यामध्ये ऋजुता दिवेकरचं खास मार्गदर्शन होतं. त्यानंतर ऋजुता दिवेकर हे नाव फिटनेस क्षेत्रात फारच प्रसिद्ध झाले.
The gentleman next to me on the flight ordered for chai with milk and sugar, such a rare thing these days. Had a tough time holding back my tears.
— Rujuta Diwekar (@RujutaDiwekar) May 2, 2018
नुकतचं ऋजुताने चहाबाबत केलेल्या ट्विटवरून तिला ट्रोल करण्यात आलं. विमानप्रवासात ऋजुताच्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने दूध आणि साखरेचा चहा ऑर्डर केला. हा चहा लोकं ऑर्डर केलं हे पाहून मी गहिवरले अशा आशयाचं ट्विट तिने केले. अनेक नेटकर्यांनी या ट्विटनंतर ऋजुताला ट्रोल केले. ग्रामीण भारतामध्ये अजूनही अशा प्रकारचा चहा आम्ही पितो असा सल्ला अनेकांनी ऋजुताला दिला. चहा सेवनाबाबातचे तुमच्या मनातील हे'4' आजच दूर करा असा सल्ला ऋजुताने दिला आहे.
हेल्दी मार्गाने आणि भारतीय खाद्यपदार्थांचा आनंद घेत वजन कसं घटवावं याकरिता देशापरदेशात ऋजुता खास सेमिनार घेते. सोबतच तिने वेटलॉसचे फंडे सांगणारी काही पुस्तकंही लिहली आहेत.