मुंबई : कोलेस्ट्रॉल हे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये आढळतं. कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरासाठी महत्वाचं असलं तरी त्याची पातळी जास्त असल्यास ते धोकादायक मानलं जातं. याचं एक कारण असं की, रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असल्याने रक्त पेशी आकुंचन पावू लागतात, त्यामुळे धमन्यांमधील रक्तप्रवाह मोठ्या प्रमाणात कमी होतो. शरीरात कोलोस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं की हृदयाच्या झटक्याचा धोकाही वाढतो.
कोलेस्ट्रॉल वाढल्याची इतर त्रासांप्रमाणे शरीरात कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. जेव्हा शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी मर्यादेपेक्षा जास्त वाढते, तेव्हा काही लक्षणे दिसू लागतात. अशा परिस्थितीत, रक्तातील कोलेस्टेरॉल पातळीचं निरीक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमची नियमित तपासणी करणं.
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, एखाद्या व्यक्तीने वयाच्या 20 व्या वर्षी रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी तपासणं सुरू केलं पाहिजे.
हृदयरोग तज्ज्ञांच्या म्हणणे आहे की 9 वर्षांच्या मुलांमध्ये प्रथम लिपिडची पातळी तपासली पाहिजे, त्यानंतर 17 ते 20 वर्षांच्या दरम्यान लिपिडची पातळी तपासली पाहिजे.
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, लहान वयातच मुलांनी कोलेस्ट्रॉलची पातळी तपासली पाहिजे.
रक्तातील कोलेस्टेरॉलची झपाट्याने वाढणारी प्रकरणं लक्षात घेता, कोलेस्ट्रॉलची पातळी तपासण्याची रोजची सवय करणे अत्यंत आवश्यक आहे. भारतातील रक्तातील कोलेस्ट्रॉलबद्दल बोलायचं झालं तर शहरातील 25 ते 30 टक्के लोक आणि ग्रामीण भागातील 15 ते 20 टक्के लोकांना कोलेस्ट्रॉलची समस्या भेडसावते.
तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे की, 20 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी दर 5 वर्षांनी त्यांच्या कोलेस्टेरॉलची चाचणी घ्यावी आणि त्यानंतर चाचणीची फ्रिक्वेंसी वाढवता येईल.