Plant Based Diet For Cholesterol : आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास कमी पडत असतो. त्यामुळे आज कॉलेस्ट्रोल (Cholesterol) वाढीची चिंता अनेकांना सतावत असते. कॉलेस्ट्रोल कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो, मात्र यश मिळत नाही. आता कॉलेस्ट्रोलचे टेन्शन घेण्याची गरज नाही. (Health News) नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून असे दिसून आले आहे की, बदाम, सोया, कडधान्ये आणि शेंगा यासह वनस्पतींवर आधारित आहार घेतला तर कॉलेस्ट्रोल कमी होण्यास मदत होते. तसेच वनस्पतीयुक्त आहार घेतल्याने थोड्या प्रमाणात स्टेरॉलमुळे ब्लड प्रेशर, ट्रायग्लिसरायड्स आणि जळजळ यासह हृदयविकाराचे अनेक धोके कमी होऊ शकतात. संशोधकांच्या मते, हा पॅटर्न पोर्टफोलिओ आहार म्हणून ओळखला जातो आणि तो 2,000 कॅलरी आहारावर आधारित आहे. (Health Infromation News)
कमी कॉलेस्ट्रोल आहारासह वनस्पती-आधारित पदार्थांचे सेवन केल्याने कमी-घनतेचे लिपोप्रोटीन कॉलेस्ट्रोल 30 टक्क्यांनी कमी होते. याशिवाय, संशोधकांना असे आढळून आले की, या आहाराच्या सेवनाने हृदयविकाराचा झटक्याचा धोका कमी होतो. तसेच हृदयविकाराचा एकूण धोका 13 टक्क्यांनी कमी होतो.
कॅनडातील टोरंटो विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक लेखक जॉन सिव्हनपिपर म्हणाले, 'पोर्टफोलिओ आहारामुळे एलडीएल कॉलेस्ट्रोल कमी होते हे आम्हाला माहीत आहे, परंतु ते आणखी काय करु शकते याचे स्पष्ट चित्र आमच्याकडे नाही.
जॉन सिव्हनपाइपर म्हणाले, 'हा अभ्यास आहाराचे परिणाम आणि त्याच्या आरोग्याच्या संभाव्यतेबद्दल अधिक स्पष्टता आणि सत्यतेसह स्पष्ट करतो.' जर्नल कार्डिओव्हस्कुलर डिसीजमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधकांनी 400 रुग्णांसह सात नियंत्रित चाचण्यांचे विश्लेषण केले.
जॉन सिव्हनपाइपर यांना आढळून आले की रक्तदाबाचा धोका दोन टक्के कमी झाला आणि जळजळ होण्याचा धोका 32 टक्के कमी झाला. संशोधकांनी सांगितले की, आहार आणि जीवनशैलीत बदल करुन, रुग्णाला उच्च कॉलेस्ट्रोल आणि हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी करु शकतो. या दृष्टीने सध्याचा अभ्यास या दिशेने आणखी तर्काजवळ नेत आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)