गाय, म्हशीपेक्षा अधिक फायदेशीर झुरळांंच दूध !

पूर्वी गायी, म्हशी अगदी बकरीचं दूध आरोग्याला पोषक असाल्याने त्याचा आहारत समावेश करण्यात आला. 

Updated: May 29, 2018, 04:19 PM IST
गाय, म्हशीपेक्षा अधिक फायदेशीर झुरळांंच दूध ! title=

मुंबई : पूर्वी गायी, म्हशी अगदी बकरीचं दूध आरोग्याला पोषक असाल्याने त्याचा आहारत समावेश करण्यात आला. हळूहळू पुढे 'वेगन' मंडळी सोया मिल्क, ओट्स मिल्क, बदामाचं दूध, नारळाचं दूध यांचा आहारात समावेश करायला लागले. पण तुम्ही झुरळाचं किंवा कॉकरोच मिल्क याबद्दल कधी ऐकलंय का? झुरळ हा किळसवाणा प्राणी असला तरीही नव्या संशोधनानुसार आरोग्यासाठी आता या प्राण्याचाही सकारत्मकतेने विचार केला जाणार आहे. झुरळाच्या शरीरातही दूध असते. ज्याला मिल्क क्रिस्टल म्हटले जाते. यामध्ये अनेक आरोग्यदायी फायदे असतात. त्यामध्ये प्रोटीन घटक मुबलक प्रमाणात आढळातात. झुरळांंना घराबाहेर ठेवण्यासाठी स्वयंपाकघरातील 'हा'च पदार्थ ठरणार फायदेशीर

काय आहे संशोधकांचा दावा ? 

इंटरनॅशनल युनियन ऑफ क्रिस्टलोग्राफीच्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, झुरळाचे ( कॉकरोच)  दूध अत्यंत पौष्टिक असते. त्यामुळे त्याला पावरहाऊस म्हटले जाते. संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, झुरळं त्यांच्या मुलांना ही मिल्क क्रिस्टल देतात. ही मिल्क क्रिस्टल्स मानवी शरीरासाठीदेखील फायदेशीर आहेत. 

संशोधकांच्या दाव्यानुसार, झुरळाचे दूध गायीच्या दूधापेक्षा चारपट तर म्हशीच्या दूधापेक्षा तिप्पट अधिक फायदेशीर असते. या दूधामध्ये अमिनो अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असतात. यामुळे पेशींची वाढ सुधारते. झुरळाच्या दूधामध्ये आढळणारी लिपिड्स मानवी आरोग्य सुधारण्यास मदत करते. त्यामधील साखरेचे घटक शरीराला उर्जा देण्यास मदत करतात. 

कसे ठरणार फायदेशीर? 

संचारी बॅनर्जी यांनी केलेल्या दाव्यानुसार, मिल्क क्रिस्टल जेवणाप्रमाणेच असतात. यामध्ये फॅट्स, सहुगर, प्रोटीन घटक मुबलक प्रमाणात आढळतात. केवळ गाय किंवा म्हशीप्रमाणे सहज झुरळाचं दूध काढता येऊ शकत नाही. रिपोर्ट्सनुसार, भविष्यात हे एका औषधाप्रमाणे वापरता येऊ शकते. या दूधाचा औषधात वापर करण्यासाठी सुमारे 100 झुरळांची गरज पडते.