नकळत होणाऱ्या या ३ चुकांमुळे वजन वाढू लागते!

खूप प्रयत्न करुनही वजन कमी होत नाही, असा अनुभव अनेकांना आला असेल. 

Updated: May 19, 2018, 09:02 AM IST
नकळत होणाऱ्या या ३ चुकांमुळे वजन वाढू लागते! title=

मुंबई : खूप प्रयत्न करुनही वजन कमी होत नाही, असा अनुभव अनेकांना आला असेल. पण तुम्हाला ठाऊक आहे का? तुमच्या नकळत होणाऱ्या चुकांमुळेच तुम्हाला या समस्येला सामोरे जावे लागते. अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे वजन वाढू लागते. वजन वाढल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या तोंड वर काढू लागतात. कोलेस्ट्रॉल, मधुमेह, रक्तदाब या समस्या शरीराला घेरू लागतात. पण नकळत होणाऱ्या या चुका टाळल्यास वजन कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

जेवताना टी.व्ही. पाहणे

टी.व्ही. पाहताना जेवणात नीट लक्ष नसते. आपण काय जेवतो, किती जेवतो, याचे भान नसते. लक्ष सर्व टी.व्ही.वरील कार्यक्रमात असते. त्यामुळे भुकेपेक्षा कमी किंवा अधिक खाल्ले जाते. त्याचा थेट परिणाम वजनावर होतो.

झोपेची कमी

झोपेची कमतरता वजन वाढण्याचे एक मोठे कारण आहे. जे लोक रात्री जागरण करुन सकाळी उशिरा उठतात, त्यांना वजन वाढीस सामोरे जावे लागते.

नाश्ता न करणे

सकाळच्या घाईत, ऑफिसला जाण्याच्या धावपळीत अनेकजण नाश्ता न करता घरातून बाहेर पडतात. त्यामुळे शरीराचे नुकसान होते. कारण सकाळचा नाश्ता हा दिवसभरातील महत्त्वपूर्ण आहार असतो. तो टाळल्यामुळे दिवसभरासाठी मिळणारी ऊर्जा मिळत नाही. त्यामुळेही वजन वाढू लागते.