बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात सध्या मोठ्या प्रमाणात मधुमेहाचे रुग्ण आढळून येत आहेत.शरीरातील साखर अति प्रमाणत वाढल्यास मधुमेहाचा जास्त त्रास होतो. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे फार महत्वाचे असते. अशा परिस्थितीत, मधुमेहापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, तुम्हाला अशा गोष्टींचे सेवन करावे लागते, ज्या तुमच्या शरीरातील साखरेला नियंत्रणात ठेवतील.
छोट्या-छोट्या घरगुती उपायांनी सुध्दा रक्तातील साखरेचे प्रमाण कंट्रोल करता येते हे सगळ्यांनाच माहीत असेल, पण तुळशीच्या पाण्यानेही ब्लड शुगर कंट्रोल करता येते हे फार कमी लोकांना माहीत असेल. चला तर मग समजून घेऊया तुळशीच्या पाण्याचे कसे सेवन करावे आणि त्याचे काय फायदे होतील.
- रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी तुळशीचे पाणी प्या
तुळशीच्या पाण्यानेही रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येते. यासाठी चार ते पाच तुळशीची पाने पाण्यात टाकावी. हे पाणी काही वेळ गॅसवर उकळा. दिवसभरात एकदा सकाळी किंवा संध्याकाळी या पाण्याचे सेवन करा. यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहील.
- तुळशीचे पाणी पिण्याचे फायदे
रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवते
तुळशीचे पाणी वजन नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त
तुळशीचे पाणी सर्दी आणि खोकलावर गुणकारी आहे
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही तुळशीचे पाणी फायदेशीर