मुंबई : आजकाल अनेक रेस्ट्रॉरंट्समध्ये खास 'तंदूर कॉर्नर' असतात. आजकाल ओव्हनमध्येही 'चारकोल इफेक्ट' दिला जातो. मात्र अशाप्रकारे कोळश्यावर बनवलेले जेवण चविष्ट लागत असले तरीही आरोग्याला मारक आहे. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या एका अहावालात हा सल्ला देण्यात आला आहे.
पूर्वीच्या काळी लाकूड आणि कोळश्याचा वापर करून चुल्ही पेटवल्या जात असे. मात्र यामुळे आरोग्याला अनेकप्रकारचे धोके आहेत. श्वसनविकारासोबत हृद्यविकाराचाही धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे तंदूरी खाण्याचा सतत मोह होत असल्यास त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचे आहे.
ब्रिटनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या डेरिक बेनेट यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळसा, लाकडाची चूल वापरणार्यांनी लवकरात लवकर गॅस किंवा वीजेच्या शेगडीचा वापर करायला सुरूवात करावी. लाकूड किंवा कोळसा जाळल्याने वायु प्रदूषण होते. सोबतच हृद्याचे विकार बळावण्याची शक्यता अधिक आहे. परिणामी हद्यविकाराने अकाली मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.
चीनमध्ये 2004-2008 या काळात 10 भागात 30 ते 79 वयोगटातील 3,41,730 लोकांवर प्रयोग करण्यात आला आहे. त्यांना जेवण बनवण्यासाठी कशाचा वापर करत असल्याचे विचारण्यात आले. त्यानंतर मिळालेल्या उत्तरांनुसार जेवण बनवण्यासाठी लाकूड, कोळसा अशा घटकांचा वापर करण्यांमध्ये हृद्यविकार अधिक प्रमाणात जडल्यचे निदर्शनास आलं आहे. हार्ट अटॅक येण्यापूर्वीचे '5' धोकादायक संकेत ...