H3N2 मुळे वाढतायत कोरोनाचे रुग्ण? जाणून घ्या काय आहे H3N2 इन्फ्लूएंझा-कोरोनात फरक

H3N2 इन्फ्लूएंजा व्हायरस कोरोनापेक्षा अधिक भयंकर असल्याची भिती वर्तवली जातेय. हा व्हायरस कोरोनापेक्षा भयंकर आहे असं का मानलं जातंय.. जाणून घ्या H3N2 इन्फ्लूएंझा-कोरोनातील फरक

Updated: Mar 13, 2023, 09:50 PM IST
H3N2 मुळे वाढतायत कोरोनाचे रुग्ण? जाणून घ्या काय आहे H3N2 इन्फ्लूएंझा-कोरोनात फरक title=

H3N2 Influenza : H3N2 इन्फ्लूएंजा व्हायरस दिवसेंदिवस अधिक घातक होत चाललाय. मात्र या व्हायरससंबंधी (Virus) एक धक्कादायक माहिती समोर आलीय. या व्हायरसमुळे कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढतेय की काय अशी भिती व्यक्त करण्यात येतेय. आरोग्य मंत्रालयानं (Health Department) जारी केलेल्या आकडेवारीनुसार 113 दिवसांनंतर रविवारी देशात पहिल्यांदाच कोव्हिडचे 524 रुग्ण आढळून आले. यापूर्वी 18 नोव्हेंबर 2022 ला देशात कोरोनाचे 500  रुग्ण सापडले होते. कोरोनाच्या H1N1 म्यूटेशनप्रमाणेच H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरसही स्वत:चं रुप बदलतोय. दरम्यान कोरोना आणि H3N2 इन्फ्लूएंझामध्ये काय फरक आहे पाहुयात.. 

कोरोना आणि H3N2 मध्ये फरक काय ? 
कोरोना आणि H3N2ची बहुतेक लक्षणे सारखीच


कोरोनामुळं श्वसन मार्ग प्रभावित होतो


H3N2 मुळे नाक, गळा, डोळ्यांमध्ये जळजळ


कोरोनाची सर्वत्र टेस्ट करता येते


H3N2 ची टेस्ट काही खासगी हॉस्पिटलमध्येच शक्य


H3N2 टेस्टसाठी 6 हजार रुपये खर्च

राज्यांना सतर्कतेचे आदेश
H3N2 एन्फ्लूएन्झा (H3N2 Influenza) व्हायरस आहे. देशभरात या विषाणू रुग्ण झपाट्यानं वाढतायत. कर्नाटक आणि हरयाणा या राज्यांमध्ये फ्लूने आतापर्यंत दोन बळी घेतलेत. शेकडो रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यामध्ये रूग्णांची वाढती संख्या पाहता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मंडाविया (Mansukh L. Mandaviya) सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. गर्भवती महिला, 5 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं आणि वयोवृद्ध नागरिकांमध्ये हा फ्लू झपाट्यानं पसरतोय. एवढंच नव्हे तर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही एन्फ्लूएन्झा संक्रमित होण्याचा धोका जास्त आहे.

लहान मुलं आणि वृद्धांमध्ये H3N2 व्हायरस वेगानं पसरतो. अगदी कोरोनासारखीच याची लक्षणं असल्यानं नेमकी कशाची बाधा झालीय याचा अंदाज येत नाही. साहजिकच याचा परिणाम उपचारांवर होतोय आणि हा व्हायरसही वेगानं पसरतोय. 2020 च्या मार्च महिन्यातच कोरोनाचा विस्फोट जगासह देशात झाला होता. आता पुन्हा एकदा H3N2 ची टांगती तलवार राज्यासह देशावर आहे..