मुंबई : कोरोना व्हायरसचा धोका अजूनही टळलेला नाही. पुन्हा एकदा आलेल्या नव्या व्हेरिएंटमुळे कोरोना व्हायरस हा अजूनही आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय बनलाय. दरम्यान भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये घट होताना दिसतेय, परंतु व्हायरस अजूनही संपलेला नाही.
कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनानंतर लागू करण्यात आलेले निर्बंध उठवण्यात आलेत. या सगळ्यात देशात कोरोना व्हायरसरचा एक नवीन व्हेरिएंटही प्रकारही सापडला आहे.
Omicron चे नवा सब व्हेरिएंट शोधण्यासाठी ट्रॅकिंग आणि त्यांची चाचणी करणं आवश्यक आहे. WHO आणि त्याच्यासह अनेक शास्त्रज्ञ त्यांचे नवे मॉड्युलेशन शोधण्याचा प्रयत्न करतायत. कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन प्रकाराचे 300 हून अधिक सब-व्हेरिएंट अनेक देशांमध्ये वेगाने पसरताना दिसतोय. यापैकी सर्वाधिक म्हणजे सुमारे 76 टक्के BA.5 चे सब-व्हेरिएंट आहेत.
गेल्या जल
गेले जवळपास 3 वर्षे कोरोना व्हायरसला आपण झेलतोय. परंतु एकदा संसर्ग झाल्यानंतर होणाऱ्या परिणामांबाबत अजूनही अनिश्चितता दिसून येतोय. मुख्य म्हणजे कोणाला कोरोनाता संसर्ग झाला असेल तर त्या व्यक्तीला भविष्यात अनुवांशिक काय परिणाम होईल, याबाबत अजून माहिती मिळालेली नाही.
दरम्यान दुसरीकडे देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने शिरकाव केलाय. त्यामुळे आरोग्य यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. तसेच वाढत्या केसेस पाहता मुंबई-केरळमध्ये अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. तज्ञांकडून सांगण्यात आले आहे की, कोविड -19 चे रुग्ण कोणत्या ही क्षणी वाढू शकतात.
ओमायक्रोनचा सब व्हेरिएंट ‘एक्सबीबी’ने भारतात आधीच शिरकाव केला आहे. केरळसह देशातील काही राज्यांत या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रातही नव्याने आढळणाऱया रुग्णांमध्ये या व्हेरिएंटची लक्षणे दिसून येत आहेत.
गेल्या तीन दिवसांत मुंबईत (mumbai corona case) कोविडच्या 150 हून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचदरम्यान गेल्या पाच दिवसांत दररोज सरासरी 10 जणांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. शुक्रवारी राज्यात 477 नवीन रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 178 मुंबईत आहेत.