दिल्ली : भारतात सीरम इंस्टिट्यूटकडून तयार करण्यात येणाऱ्या कोव्हिशील्ड या लसीला ब्रिटीश सरकारने मान्यता न देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोव्हिशील्ड वरील या धोरणाबाबत यूकेने अखेर मोठा बदल केला आहे. यूकेने आता भारत निर्मित कोविशील्डला मान्यताप्राप्त लस म्हणून स्वीकारलॆ आहे. यासंदर्भात नवीन ट्रॅवल गाईडलाईन्स जारी करण्यात आली आहेत.
यूके सरकारच्या वतीने असं म्हटलं गेलं आहे की, जर एखाद्या भारतीयाने कोव्हिशील्ड कोरोना लस घेतली असेल आणि यूकेला गेला असेल तर त्याला अजूनही विलगीकरणात ठेवणं आवश्यक आहे. भारतामध्ये लसीचे दोन डोस घेऊन आलेल्यांनाही विलगीकरणाचा नियम लागू करण्यामागे आम्हाला कोविशिल्डला आक्षेप नसून भारतात लसीकरणानंतर दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रासंदर्भात आक्षेप असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
यूकेच्या ताज्या ट्रॅवल अॅडवायजरीनुसार, ही ट्रॅवल अॅडवायजरी 4 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. ही काही दिवसांपूर्वी जारी करण्यात आली होती. परंतु दरम्यानच्या काळात कोव्हिशील्डला मान्यता दिली नसल्याने त्याबद्दल वाद होता. आता नवीन गाईडलाईन्समध्ये कोविशिल्डचं नाव जोडलं गेलं आहे.
COVID19 | In its revised travel advisory, the UK government says Covishield qualifies as an approved vaccine pic.twitter.com/B5R52cDu6v
— ANI (@ANI) September 22, 2021
ताज्या ट्रॅव्हल अॅडव्हायझरीमध्ये नवीन गोष्ट अशी आहे की, "चार सूचीबद्ध लसींचे फॉर्म्युलेशन्स ज्यात अॅस्ट्राजेनिका कोविशील्ड, अॅस्ट्राजेनिका व्हॅक्सजेवेरिया, मॉडर्ना टाकेडा या लस म्हणून मंजूर आहेत."
ज्या गोष्टी आधीच्या क्रमाने लिहिल्या होत्या त्या आताही लिहिल्या आहेत. यामध्ये असं म्हटलं गेलं की यूके, युरोप, अमेरिकेच्या लसीकरण कार्यक्रमात, ज्या लसींच्या अंतर्गत लसीचा विचार केला जाईल त्यांनाच 'पूर्णपणे लसीकरण' असलेलं मानलं जाईल.