देशात 'या' ठिकाणी एका दिवसात Corona मुळे 9 जणांचा मृत्यू

दरम्यान पॉझिटीव्हीटी रेट 6.14% वर पोहोचला आहे. 

Updated: Aug 24, 2022, 06:21 AM IST
देशात 'या' ठिकाणी एका दिवसात Corona मुळे 9 जणांचा मृत्यू title=

मुंबई : दिल्लीत गेल्या 24 तासांमध्ये 959 लोकं कोरोना पॉझिटिव्ह आढळले असल्याची नोंद आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनामुळे काल एकूण 9 जणांनाआपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान पॉझिटीव्हीटी रेट 6.14% वर पोहोचला आहे. 

एक दिवस आधी 625 लोक पॉझिटिव्ह आढळले होते, तर 7 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. 21 ऑगस्ट रोजी 942 प्रकरणं नोंदवली गेली परंतु कोविडमुळे एकाचाही मृत्यू झाला नाही. 20 ऑगस्ट रोजी 1109 नवीन रुग्ण आढळून आले आणि 9 रुग्णांचा मृत्यू झाला. त्या दिवशी, कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट 11 टक्क्यांहून अधिक होता.

देशात सलग दुसऱ्या दिवशी 10 हजारांहून कमी प्रकरणं 

गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 8586 नवीन रुग्ण आढळलेत. तर एक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 लाखांच्या खाली आहे. आकडेवारीनुसार, एक्टिव्ह प्रकरणांची संख्या 96,506 आहे. देशात कोरोनामुळे एका दिवसात आणखी 48 लोकांचा मृत्यू झाला, त्यानंतर मृतांची संख्या 5,27,416 झाली. 

गेल्या 24 तासांत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 1,142 ने घट झालीये. रुग्णांचा बरं होण्याचा दर 98.59 टक्के आहे. एक दिवस आधी 22 ऑगस्ट रोजी 9531 लोक पॉझिटिव्ह आढळले होते तर 36 लोकांचा मृत्यू झाला होता. 21 ऑगस्ट रोजी 24 तासांत 11 हून अधिक तर 20 ऑगस्ट रोजी 13,272 नवीन प्रकरणांची नोंद झाली होती.

राहुल द्रविड कोरोना पॉझिटिव्ह 

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. आशिया चषकापूर्वी पॉझिटीव्ह असणं हा टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जातो. 27 ऑगस्टपासून यूएईमध्ये आशिया कपला सुरुवात होणार आहे. 28 ऑगस्ट रोजी भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे.