Weight Loss: आहारात आइसक्रिमचा समावेश असूनही महिलेनं कमी केलं 40 किलो वजन, कसं ते जाणून घ्या

एकदा वजन वाढलं की कमी करणं कठीण असतं. वजन कमी करण्यासाठी व्यायाम, योगासह आहारावर नियंत्रण मिळवावं लागतं.

Updated: Jun 4, 2022, 12:26 PM IST
Weight Loss:  आहारात आइसक्रिमचा समावेश असूनही महिलेनं कमी केलं 40 किलो वजन, कसं ते जाणून घ्या title=

मुंबई: एकदा वजन वाढलं की कमी करणं कठीण असतं. वजन कमी करण्यासाठी व्यायाम, योगासह आहारावर नियंत्रण मिळवावं लागतं. मात्र इतकं करूनही कधी कधी वजन कमी होत नाही. त्यामुळे पदरी निराशा पडते. पण एका महिलेनं वेगळाच डाएट प्लान करून आपलं वजन कमी केलं आहे. दीपा सोनी असं या महिलेचं नाव आहे. दीपा सोनी यांचं वजन 100 किलोंच्या आसपास पोहोचलं होतं. अति लठ्ठपणामुळे त्यांना कमर आणि गुडघे दुखीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांनी आपलं वजन कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यांच्या प्रयत्नांना यश देखील आलं आणि तब्बल 40 किलो वजन कमी केलं. 

आहार

दिवसातून चारवेळा खायच्या असं दीपा यांनी सांगितलं आहे. त्यांचा नाश्ताही चांगला होता. त्यात दूध आणि अंडी यासारखा पौष्टीक आहार होता. दुपारच्या जेवणात ५ ग्रॅम तूपासह वरण आणि हिरव्या भाज्यांचा समावेश होता. संध्याकाळच्या नाश्त्यात त्या पारले जी बिस्किट खायच्या आणि रात्रीच्या जेवणात तूपासह थोडं पनीर खात होत्या. कधी कधी त्या आइसक्रीम आणि गोड पदार्थही खायच्या.

व्यायाम

खाण्यासोबत दीपा सोनी यांनी व्यायामावरही लक्ष केंद्रीत केलं होतं. यामुळे त्यांना वजन कमी करण्यास मदत झाली. त्याचबरोबर त्या घरातील सर्व काम स्वत: करायच्या. हलका व्यायाम करता करता त्यांनी हेवी वेट उचलण्यास सुरुवात केली. अशी कठोर मेहनत करत त्यांनी आपलं वजन कमी केलं.