'हे' 4 पदार्थ खाल्ल्याने रक्तातील शुगर नियंत्रणात, डायबिटीजच्या रुग्णांनी आताच जाणून घ्या

Diabetes Diet Tips: डायबिटीज रुग्णांना आपली शुगर नियंत्रणात आणता येणार आहे. त्यांनी केवळ चार पदार्थाना प्राधान्य दिले पाहिजे. हे चार पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कायम राहिल. साखर वाढणार नाही. त्यामुळे तुमचे टेन्शन कमी होईल.

Updated: Mar 9, 2023, 07:33 PM IST
'हे' 4 पदार्थ खाल्ल्याने रक्तातील शुगर नियंत्रणात, डायबिटीजच्या रुग्णांनी आताच जाणून घ्या title=

Diabetes Diet Tips in Marathi : डायबिटीजचा धोका अनेकांना आहे.  (Diabetes ) डायबिटीजच्या रुग्णांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल, तर ज्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी असते त्या गोष्टींना प्राधान्य देण्याची गरज आहे. सध्याच्या काळात डायबिटीज ही एक मोठी समस्या बनली आहे. (Diabetes Foods  ) दरम्यान, डायबिटीजची समस्या अनुवांशिक असू शकते. परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये ती खराब जीवनशैली आणि वाईट सवयींमुळे डायबिटीजचा धोका वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे तुमचा डायबिटीज नियंत्रणात ठेवायचा असेल तर काही पदार्थांना प्राधान्य देण्याची गरज आहे.

डायबिटीजच्या आजारामुळे मूत्रपिंडाचे आजार, हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि पक्षाघात यासारख्या अनेक समस्या उद्भवतात. उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथील GIMS हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांनी सांगितले की, कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न खाल्ल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

मधुमेहाच्या रुग्णांनी हे 4 पदार्थ जरूर खावेत

1. ब्रोकोली

डायबिटीजला आळा घालायचा असेल तर प्रत्येक हिरवी भाजी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. परंतु ब्रोकोली ही सुपरफूडपेक्षा कमी नाही. ब्रोकोली नियमितपणे खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी कायम नियंत्राणात राहते. तसेच बीपी नियंत्रणात राहतो आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

2. होल ग्रेन (Whole Grain)

आपण आपल्या रोजच्या आहारात होल ग्रेनपासून बनवलेल्या वस्तूंचा समावेश केला पाहिजे. कारण ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. डायबिटीजच्या रुग्णांना रक्तातील साखरेची पातळी कायम ठेवायची असेल, तर पॉलिश केलेल्या तांदळाऐवजी ब्राऊन राइस आणि सामान्य गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मल्टीग्रेन पीठ खावे.

3. अंडी

साधारणपणे, जर तुम्ही नाश्त्यात किमान एक अंडे खाल्ले तर शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढू लागते आणि त्यामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहते. अंड्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते. जे डायबिटीजच्या रुग्णांसाठी आवश्यक असते.

4. कडधान्ये डाळी

डायबिटीजपासून तुमची सुटका व्हावी असे वाटत असेल तर कडधान्य डाळी याला प्राधान्य दिले पाहिजे. हे असे अन्न आहे जे आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे, त्याचे मिश्रण भात आणि रोटी या दोन्हींसोबत खावे. परंतु डायबिटीजच्या रुग्णांसाठी ते किती फायदेशीर ठरु शकते हे तुम्हाला माहिती आहे का? खरं तर, कडधान्ये प्रथिने आणि फायबरचा समृद्ध स्रोत आहेत, जे आरोग्यासाठी फायदेशीर सिद्ध ठरतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)