Health News : चुकूनही 'या' ठिकाणी मोबाईल सोबत नेऊ नका, होतील ‘हे’ गंभीर आजार

Health News : अनेकांना बाथरुममध्ये मोबाईल वापऱण्याची सवय असते. मात्र ही सवय महागात पडू शकते. 

Updated: Oct 28, 2022, 12:41 PM IST
Health News : चुकूनही 'या' ठिकाणी मोबाईल सोबत नेऊ नका, होतील ‘हे’ गंभीर आजार title=

Mobile in bathroom:  आजकाल मोबाईल (smartphone) फोन शिवाय जगणे कठीण झाले आहे. कुठेही जा आपल्याला आपला फोन सोबत लागतोच. पण अशा काही जागा आहेत त्या ठिकाणी फोन घेऊन जाणे धोकादायक ठरु शकते. अशा ठिकाणी मोबाईल फोन घेऊन जाणे अनेक आजारांना आमंत्रण देण्यासारखेच आहे. तर चला जाणून घेऊयात की, कोणत्या ठिकाणी मोबाईल फोनचा वापर करु नये आणि त्यामुळे कोणते नुकसान होऊ शकते. 

कुठे घेऊन जाऊ नये आपला मोबाईल फोन...

अनेकांना मोबाईल टॉयलेटमध्ये (toilet) पण सोबत लागतो. काही लोकं टॉयलेटमध्ये बसून मोबाईल फोनचा वापर करतात. कमोडवर बसून बातम्या आणि सोशल मिडीया बघत बसतात, जे खूप धोकादायक आहे. टॉयलेटच्या सीटवर अनेक प्रकारचे रोग पसविणारे बॅक्टेरिया असतात. टॉयलेटमध्ये जाऊन आपण आपले हात स्वच्छ करु शकतो पण आपल्या मोबाईलला साफ करु शकत नाही. यामुळेच अनेक आजार पसरु शकतात. 

का घेऊन जाऊ नये टॉयलेटमध्ये फोन...

टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन गेल्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते. अशा लोकांकडे व्हायरस (virus) आणि जिवाणू आकर्षित होतात. टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन गेल्याने मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाणारे लोकं त्याच घाणेरड्या हातांनी फोनला स्पर्श करतात. त्यामुळे रोगराई पसरते. 

मुळव्याधीचे बनते कारण... 

टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्यामुळे मुळव्याध होऊ शकतो. मूळव्याधीच्या (Piles) आजारांमुळे रक्त कमी होते. त्यामुळे शरीरात कमजोरी येते. मुळव्याध हा लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना होऊ शकतो. मुळव्याधीच्या व्यतिरिक्त अनेक आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे टॉयलेटसारख्या अस्वच्छ ठिकाणी मोबाईल फोन वापरणे शक्यतो टाळावे. 

वाचा : Google चे नवीन फीचर, एका क्लिकवर पाहता येणार cricket live score, कसं ते पाहा

इथे मोबाईल ठेवू नका

उशीखाली आपला मोबाइल ठेवून बरेच लोक झोपी जातात. यातून उत्सर्जित इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे (Electromagnetic radiation) डोकेदुखी होऊ शकते. आपल्याला चक्कर येणे देखील होऊ शकते. त्याच वेळी, डॉक्टरांचा असा विश्वास आहे की फोनमधून उत्सर्जित होणारी रेडिएशन मानवांसाठी खूप हानिकारक आहेत.

मागच्या खिशात मोबाइल ठेवू नका

बरेचदा लोक मागच्या खिशात फोन ठेवतात. हे आपल्यासाठी आणि आपल्या फोनसाठी चांगले नाही. कारण असे केल्याने फोन ब्रेकडाउन किंवा चोरीचा धोका वाढतो. तसेच याचा तुमच्या पायांच्या नसावर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे तुमच्या पायात वेदना होऊ शकते. त्याच वेळी, सिंपलमोस्टच्या अहवालानुसार, डॉक्टर ऑर्ली एव्हिट्झर म्हणतात की फोनला मागील खिशात ठेवल्यास पाठदुखी होऊ शकते..