फळं खाण्याची योग्य वेळ कोणती? जेवणानंतर लगेच फळं खावी का? जाणून घ्या

अनेक अहवालांमध्ये असे म्हटले आहे की, अन्न खाल्ल्यानंतर फळांचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी चांगले नाही. परंतु...

Updated: Aug 22, 2021, 09:29 AM IST
फळं खाण्याची योग्य वेळ कोणती? जेवणानंतर लगेच फळं खावी का? जाणून घ्या title=

मुंबई : जेव्हा जेव्हा चांगले किंवा हेल्थी खाण्याची चर्चा होते, तेव्हा प्रत्येकजण एक गोष्ट नक्की सांगतो की, फळे खाणे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे. फळांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात आणि हे पोषक घटक तुमच्या शरीरासाठी फायदेशीर असतात. परंतु, फळे खाण्याच्या वेळेबाबत अनेक अहवाल समोर आले आहेत आणि या अहवालांमध्ये अनेक प्रकारचे दावे करण्यात आले आहेत.

अनेक अहवालांमध्ये असे म्हटले आहे की, अन्न खाल्ल्यानंतर फळांचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी चांगले नाही. तथापि, अनेक अहवालांमध्ये असे म्हटले आहे की, जर तुम्ही अन्न खाल्ल्यानंतर फळ खाल्ले तर काही हरकत नाही. अशा परिस्थितीत, अन्न खाल्ल्यानंतर फळे खाणे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे की, नाही हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जेवणानंतर फळे खाणे योग्य आहे का?

रिकाम्या पोटी फळांचे सेवन अधिक फायदेशीर मानले जाते. बर्‍याच अहवालांमध्ये असे म्हटले गेले आहे की, जेव्हा तुमचे पोट भरलेले असते आणि जर तुम्ही त्या वेळी फळे खाण्यास सुरुवात केलीत, तर पोटाला ही फळे पचण्यास अडचण जाणवते. ज्यामुळे तुम्हाला फळांचे पूर्ण पोषण मिळू शकणार नाही. म्हणून, अन्न खाल्ल्यानंतर काही काळाने फळे खाणे फायदेशीर आहे.

पण, बहुतेक आहारतज्ञ म्हणतात की, जेवणानंतर तुम्ही फळे खाऊ शकता. आहारतज्ज्ञ म्हणतात की, बहुतेक फळे व्हिटॅमिन Cने समृद्ध असतात आणि पचन करण्यास मदत करतात. त्यामुळे हे फळांवर अवलंबून असते की, कोणत्या वेळेला कोणते फळ खावे. उदाहरणार्थ, जर तुम्ही अन्न खाल्ल्यानंतर लगेच टरबूज सारखी फळे खाल्ली, तर तुम्हाला पचनामध्ये अडचण येऊ शकते. त्यामुळे व्हिटॅमिन Cसारखे फळे जेवणानंतर तुम्ही खाऊ शकता. परंतु बाकी प्रकारची फळे खाणे टाळावे.

शक्यतो अन्न खाल्ल्यानंतर फळे खायची असतील, तर लक्षात ठेवा की अन्न खाल्ल्यानंतर लगेच फळे खाऊ नका. जेवण आणि फळांमध्ये थोडे अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा तुम्हाला जास्त गरम होणे किंवा अपचन यासारख्या तक्रारी उद्भवू शकते. जर तुम्ही काही वेळानंतर फळ खाल्ले, तर ते तुमचे जेवण पचवण्याचे काम करते.