सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी चहाचा घोट घेताय तर सावधान...

अगदी सकाळी उठल्यासोबत चहा किंवा कॉफीचा एक घोट अनेकांना ताजतवाना करतो.

Updated: Jun 17, 2021, 08:29 AM IST
सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी चहाचा घोट घेताय तर सावधान... title=

मुंबई : चहा म्हणजे अनेकांचा जीवच...केवळ चहाच नाही तर बहुतांश लोकं कॉफीप्रेमीही असतात. अगदी सकाळी उठल्यासोबत चहा किंवा कॉफीचा एक घोट अनेकांना ताजतवाना करतो. तुम्हाला देखील सकाळी उठल्याबरोबर उपाशी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय आहे का? जर ही सवय असेल तर ती वेळीच बदला. कारण तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. 

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, ज्या व्यक्ती सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी पितात त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, त्यांचं पोट एसिडिक पीएच स्केलवर असतं. चहा हा एसिडिक असतो. अशामध्ये जेव्हा तुम्ही उपाशी पोटी चहा पिता तेव्हा हार्ट बर्नची समस्या होऊ शकते. इतकंच नाही तर तुमच्या शरीरातील मेटाबॉलिक एक्टिव्हिटीज यांच्यात अडथळा येतो.

रिकाम्या पोटी चहा आणि कॉफी पिण्याचे तोटे

चहा आणि कॉफी हे दोन्ही एसिडिक असतात. रिकाम्या पोटी यांचं सेवन केल्याने एसिडिक संतुलन बिघडू शकतं आणि यामुळे एसिडिटीचा त्रास होऊ शकतो. चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर सकाळी तोंडातील बॅक्टेरिया साखरेला ब्रेक करतात, ज्यामुळे तोंडातील एसिडची पातळी वाढते. तर काहींना सकाळी दुधाचा चहा प्यायल्यानंतरही काही पोटफुगीची समस्या वाटू शकते. 

चहा आणि कॉफी पिण्याची योग्य वेळ

चहा किंवा कॉफी पिण्याची उत्तम वेळ म्हणजे खाल्ल्यानंतर 1-2 तास. तुम्ही सकाळी देखील चहा-कॉफी पिऊ शकता. परंतु रिकाम्या पोटी पिणं टाळलं पाहिजे. 

रिकाम्या पोटी चहा प्यायल्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं. विशेषत: जेव्हा ते 8-9 तासांच्या झोपेनंतर सकाळी उपाशीपोटी चहा घेतला तर डिहायड्रेशनचा धोका अधिक असतो.