मुंबई: आंबा हे फळ शरीरासाठी फार फायदेशीर आहे. अँटीऑक्सीडेंट, प्रोटीन, व्हिटॅमीन 'ए', 'बी' आणि 'सी'ची भरपूर मात्रा असलेले हे फळ शरीराला आरोग्यदाई आहे. पण, या फळाचे सेवन केल्यावर या 5 घटकांचे मुळीच सेवन करू नका. अन्यथा तुम्हाला आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल. कारले, मिर्ची, दही, कोल्ड ड्रिंक, पाणी हे ते पाच घटक होय.
कारले
आंबा खाल्ल्यानंतर कारले मुळीच खाऊ नका. कारण, आंबा हा गोड असतो तर, कारले कडू. गोड पदार्थावर जेव्हा कडू पदार्थ खाल्ला जातो तेव्हा त्याची रिअॅक्शन येते. अशा प्रकारे रिअॅक्शन झाली तर, त्या व्यक्तीला उलटी, मळमळ, श्वसनास त्रास आदी गोष्टींचा सामना करावा लागतो. काही प्रमाणात व्यक्ती आजारीही पडतो.
मिर्ची
आंबा खाल्ल्यावर शक्यतो ३ तास तरी, मिर्चीचे सेवन करू नका. जर तुम्ही आंबा खाल्ल्यावर मिर्चीचे सेवन केले तर, तुम्हाला पोटात जळजळ, आग आदी गोष्टींचा सामना करावा लागू शकतो.
दही
आंबा खाल्ल्यावर चुकूनही दही खाऊ नका. आंबा खाल्ल्यावर दह्याचे सेवन केल्यास घसा, डोके दुखू शकते. सर्दी आणि खोकलाही संभवतो. तसेच, काही रूग्णांमध्ये हगवण लागण्याचे प्रमाणही बळावते.
कोल्ड ड्रिंक
आंबा खाल्ल्यानंतर लगेचं कोल्ड ड्रिंक प्यायलो तर आरोग्यास फार हानिकारक असतं. कारण आंब्यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. शिवाय कोल्ड ड्रिंकमध्ये देखील साखरेचं प्रमाण जास्त असतं. आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड ड्रिंक प्यायल्यास मधुमेह होण्याची दाट शक्यता असते.
पाणी
आंबे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायला नको. वास्तविक आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने पोटदुखी, गॅसची समस्या उद्भवते. आंबा खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे.