मुंबई : हिवाळा आता तोंडावर आला आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेतात. अशावेळी डोळ्यांची काळजी घेणं देखील फार महत्त्वाचं असतं. थंडीमध्ये अनेकवेळ्या आपल्या डोळ्यांची आग होते, थोडं अंधुकही दिसू लागतं. मात्र जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, थंडीच्या दिवसांत हवा शुष्क असते त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणं गरजेचं असतं.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हवेतील परागकणांमुळे, प्रदूषणामुळे, आणि धुक्यामुळे डोळ्यांना संसर्ग होण्याची भीती असते. डोळे शुष्क पडणं, डोळ्यांना खाज येणं, पाणी येणं, लाल होणं या तक्रारी घेऊन अनेक रूग्ण माझ्याकडे येतात.”
डोळ्यांमधला ओलावा जपा
थंडीत आपण शक्यतो हिटरचा वापर करतो. मात्र या हिटरच्या तापमानामुळे डोळे कोरडे पडण्याची तसेच डोळ्यांना खाज येण्याची दाट शक्यता असते. म्हणून डोळ्यांसाठी मॉइश्चरायझिंग आय ड्रॉपचा वापर करावा. तसंच हिटरच्या समोर बसताना थोडं अंतर ठेवावं.
युव्ही किरणापासून वाचण्यासाठी सनग्लासेलचा वापर करा
गरमीच्या दिवसांपेक्षा थंडीच्या दिवसांत सूर्य किरणांचा डोळ्यांवर परिणाम होतो. त्यामुळे अशी समस्या आढळल्यास त्वरित डोळ्यांच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. आणि घराबाहेर पडताना गॉगलचा वापर करा