fact check | डार्क चॉकलेट खाल्ल्याने आयुष्य वाढतं? पाहा काय आहे सत्य

डार्क चॉकलेट्स खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. हृदयविकारसारख्या आजारापासून तुम्ही दूर राहाल, असा दावा या व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

Updated: Apr 21, 2022, 10:33 PM IST
fact check | डार्क चॉकलेट खाल्ल्याने आयुष्य वाढतं? पाहा काय आहे सत्य title=

मुंबई : सोशल मीडियावर अनेक मेसेजेस व्हायरल होत असतात. मात्र ते मेसेजस नेहमीच खरे असतात असं नाही. अनेकजण व्हायरल मेसेजची खातरजमा न करता आहे तसाच फॉरवर्ड करतात. त्यामुळे अफवांना पेव फुटतो. असाच एक मेसेज व्हायरल होतोय. तुम्ही जर डार्क चॉकलेट्स खात असाल तर तुमचं आयुष्य वाढू शकतं, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. हा दावा लोकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने आम्ही याची पोलखोल केली. मग काय सत्य समोर आलं, हे आपण जाणून घेऊयात. (fact check of viral messege dark chocolate eat and increse life)

व्हायरल मेसेजमध्ये दावा काय?

डार्क चॉकलेट्स खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. हृदयविकारसारख्या आजारापासून तुम्ही दूर राहाल, असा दावा या व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे.  हा दावा केल्यानं अनेकांना यावर विश्वास बसू लागलाय.

स्वस्त आणि मस्त असा उपाय असल्याने अनेकजण चॉकलेट्सवर ताव मारतायत. पण, खरंच असं होतं का? त्यामुळे आम्ही या दाव्याची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याआधी व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय ते पाहुयात.

व्हायरल मेसेजमध्ये नक्की काय?

डार्क चॉकलेटमुळे आपल्या आरोग्याला अनेक सकारात्मक फायदे मिळतात. रक्तातील साखर आणि हृदयरोग यांसारख्या गंभीर रोगापासून लांब ठेवते. एवढेच नाही तर डॉर्क चॉकलेट खाल्ल्याने तणावही कमी होतो.

हा दावा केल्यानं आमच्या व्हायरल पोलखोल टीम एक्सपर्टना भेटली. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि खरंच डार्क चॉकलेट्स खाल्ल्याने आयुष्य वाढतं का? चॉकलेट्समुळे हृदयविकाराचा धोका टळतो का? याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली.

काय खरं काय खोटं? 

कोको वनस्पतीपासून चॉकलेट बनवतात. डार्क चॉकलेट्समध्ये 75 टक्के कोकोचं प्रमाण असतं. कोकोमुळे हृदयविकार टळू शकतो, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं.  डार्क चॉकलेट खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. डार्क चॉकलेटमुळे ब्लड शुगरची लेव्हलही नियंत्रित राहते, ब्लड प्रेशरही कमी करते. त्यामुळे डार्क चॉकलेट्स खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरला.