रक्त वाढवण्यासाठी फायदेशीर '5' पदार्थ

रक्ताची कामतरता स्त्रियांमध्ये कमी असल्याने त्यांच्यामध्ये अ‍ॅनिमियाची समस्या अधिक प्रमाणात आढळते.

Updated: Jul 31, 2018, 06:37 PM IST
रक्त वाढवण्यासाठी फायदेशीर '5' पदार्थ  title=

मुंबई : रक्ताची कामतरता स्त्रियांमध्ये कमी असल्याने त्यांच्यामध्ये अ‍ॅनिमियाची समस्या अधिक प्रमाणात आढळते. स्वास्थ्यकारक आरोग्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात रक्त असणं आवश्यक आहे. अन्यथा अनेक समस्या वाढण्याचा धोका असतो. 

रक्त बनण्याचं प्रमाण कमी झाल्यास हाडं कमजोर होतात. याचा परिणाम डोळ्यांवरही होतो. मेंदूच्या कार्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने विस्मृतीचा त्रास होतो. मग आरोग्याच्या लहानसहान वाटणार्‍या या समस्येमागे शरीरात रक्ताची कमतरता हे कारण असल्यास आहारात काही पदार्थांचा समावेश केल्याने नैसर्गिकरित्या रक्त वाढू शकते.  

डाळिंब - 

रक्त वाढवण्यासाठी डाळिंब अत्यंत फायदेशीर आहे. डाळिंबामध्ये आयर्न मुबलक प्रमाणात आढळतात. डाळिंब रसाच्या स्वरूपात खाण्यापेक्षा थेट खाणं अधिक फायदेशीर आहे. गरोदर स्त्रियांंनी डाळिंब खाण्याचे फायदे

बीट - 

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी बीट अत्यंत फायदेशीर आहे. आहारात सलाडपासून अगदी गोडाच्या पदार्थांपर्यंत बीटाचा समावेश करता येऊ शकतो. सकाळी नाश्ताला बीटाचा रस, पराठे यांचा समावेश केला जाऊ शकतो. 

सफरचंद - 

हिमोग्लोबीनचं प्रमाण वाढवण्याचा हमखास रामबाण उपाय म्हणजे सफरचंद. सफरचंदासोबत मध मिसळून खाणं आरोग्याला फायदेशीर आहे. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते. हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी खास 'डाएट टीप्स'

पालक - 

पालक हे आयुर्वेदामध्ये रक्तवर्धक म्हणून समजले जाते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास पालकचा रस नियमित प्यायल्यास फायदा होऊ शकतो. यामुळे रक्ताची कमतरता भरून काढण्याचा वेग बळावतो. 

खजूर - 

खजूर हा नैसर्गिकरित्या गोड असल्याने त्याचा वापर आहारात अनेक प्रकारे केला जातो. रक्ताची कमतरता भरून काढायची असल्यास दूधात खजूर मिसळून प्यावे. खारीक पूडदेखील फायदेशीर आहे. म्हणून सलाड किंवा दूधातदेखील खारीक पूड मिसळू शकता. खजूराचे बॉल्स, रोल्स हे झटपट होणारे गोडाचे पदार्थही फायदेशीर आहेत. रक्त वाढवण्यासोबत या '5' फायद्यांंसाठी चणा डाळ फायदेशीर