वजन कमी करण्यासाठी उपयुक्त फळे

बदलत्या जीवनशैलीमुळे माणसाच्या आरोग्यावर अनेक वाईट परिणाम होत आहेत.

Updated: Aug 26, 2019, 07:24 PM IST
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त फळे title=

मुंबई : वजन कमी करण्यासाठी प्रत्येक जण अनेक पर्याय वापरतात. बदलत्या जीवनशैली मुळे माणसाच्या आरोग्यावर अनेक वाईट परिणाम होत आहेत. त्यामुळे दैनंदीन आहारात काही फळांचा समावेश करणं अत्यंत महत्वाचं असतं. 

नारळपाणी : नारळपाणी पिल्याने कोलेस्ट्रॉल कमी होवून चरबी कमी होण्यास मदत होते. नारळ पाण्याने शरीरातील पचन संस्थाचे व्यवस्थित कार्य चालते. यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा देखील मिळत असते.

सफरचंद : सफरचंदमध्ये कँलरी कमी असून विटामिन सी, मिनिरल्सबरोबर फायबरची मात्रा जास्त प्रमाणात असते. त्यामुळेही वजन कमी होण्यास मदत होते.

अननस : अननसात शरारासाठी आवश्यक असणारे विटामिन, फायबर, मिनरल्सबरोबर अँटिऑक्सिडेंट असल्याने वजन कमी करण्यास मदत होते. 

द्राक्षे : द्राक्ष्यामध्ये विटामिन सी आणि फायबरची मात्रा असल्याने वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. आपल्या आहारात द्राक्षाचा समावेश केल्यास काहीच दिवसांत फरक पडतो.