Guava leaves remedy : पेरु खाण्याचे अनेक फायदे आपल्याला माहित असतील. पण पेरुच्या झाडाच्या पानांचा देखील शरीराला मोठा फायदा होता. हे एक औषध म्हणून देखील वापरलं जातं. शुगर लेव्हल नियंत्रण ठेवण्यापासून ते डायबिटीजपर्यंत अनेक समस्या ही पाने दूर करू शकतात. याशिवाय पेरूची पाने उकळून प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
सकाळी रिकाम्या पोटी पाण्यात पेरूची पाने उकळून ते पाणी पिल्याने आरोग्यास आश्चर्यकारक फायदे होतात. यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन सी, गॅलिक ऍसिड आणि फिनोलिक संयुगे, अँटिऑक्सिडेंट, दाहक-विरोधी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते : पेरूच्या पानांची चव तुरट असते. ते रक्तातील साखर कमी करण्यास आणि मधुमेहाच्या रूग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी सामान्य करण्यास मदत करते.
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त : पेरूच्या पानांचे पाणी पचन सुधारण्यासाठी आणि चयापचय वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. शरीरात साठवलेली अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यास देखील मदत करतात.
हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत : अशक्तपणात ते रक्तातील ऑक्सिजन वाढवतात. हे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्स वाढवण्यास देखील मदत करतात. तसेच लाल पेशी देखील वाढवतात.
तोंडाच्या अल्सरपासून आराम : शरीरातील उष्णतेमुळे तोंडावर आणि जिभेवर फोड आले असल्यास पेरुचे पाने पाण्यात उकळून प्यायलाने आराम मिळतो.