कानावर केस असणं देतात या गंभीर आजाराचे संकेत !

दिवसेंदिवस हृद्यरोग जडण्याचं प्रमाण वाढलं आहे. 

Updated: Jul 12, 2018, 02:06 PM IST
कानावर केस असणं देतात या गंभीर आजाराचे संकेत !

मुंबई : दिवसेंदिवस हृद्यरोग जडण्याचं प्रमाण वाढलं आहे. जीवनशैलीत  झालेले बदल, झोपण्याच्या, खाण्याचा विचित्र सवयी, लठ्ठ्पणा, आरोग्याच्या समस्या, अगदी काही लोकांमध्ये जेनेटिक समस्या आणि अनुवंशिकतेने आलेल्या समस्या यामुळे हृद्यविकार जडू शकतो हे तुम्हांला एव्हाना ठाऊक असेल पण तुमचे कानदेखील हृद्यविकाराच्या काही समस्यांना कारणीभूत ठरू शकतात हे तुम्हांला ठाऊक आहे का? 

2016 साली करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये कानावर वाढणार्‍या केसांमुळे हृद्यविकाराचा धोका वाढत असल्याचं समोर आलं आहे. 1973 साली डॉ. फ्रॅंक आणि त्यांच्या टीमने कानावर केस असलेल्या रूग्णांमध्ये हृद्यविकार अधिक असल्याचे आढळल्याचा दावा केला होता. हार्ट अटॅक येण्यापूर्वीचे '5' धोकादायक संकेत ..

testosterone हार्मोन्स निभावतात महत्त्वाची भूमिका 

स्त्रियांच्या तुलनेत ज्या पुरूषांमध्ये testosterone या हार्मोन्सचं प्रमाण अधिक असल्यास शरीरावर केसही अधिक असतात. अशा पुरूषांमध्ये हार्ट अटॅकचाही धोका अधिक असतो.  'या' रक्तगटाच्या रुग्णांंना हार्टअटॅकचा धोका कमी , संशोधकांंचा नवा खुलासा