लसूण, लवंग आणि हळद या मिश्रणाच्या नियमित सेवनाचे '4' जादुई फायदे

आजाराला सुरूवात झाली तर शरीर आपल्याला त्याचे संकेत देते. 

Updated: Jul 3, 2018, 07:29 PM IST
लसूण, लवंग आणि हळद या मिश्रणाच्या नियमित सेवनाचे '4' जादुई फायदे  title=

मुंबई : आजाराला सुरूवात झाली तर शरीर आपल्याला त्याचे संकेत देते. या लहान मोठ्या संकेतांना तुम्ही वेळीच ओळखू शकलात तर त्यावर घरगुती उपायांनी मात करणं शक्य आहे. त्यासाठी तुम्हांला डॉक्टरांचे महागडे उपचार करण्याची गरज नाही. स्वयंपाकघरातील काही पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या अ‍ॅन्टिबायोटिक गुणधर्म असल्याने आजरपण दूर ठेवण्यास मदत होते. लसूण, हळद आणि लवंग यामध्ये औषधी गुणधर्म आहे. 

कसे ठरते हे मिश्रण फायदेशीर ? 

लसणाच्या 3 पाकळ्या, 2 छोटे चमचे हळद आणि 3 लवंग हे मिश्रण एकत्र करा. कपभर गरम दूध किंवा गरम पाण्यासोबत हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी प्यावे. या मिश्रणामुळे अनेक आजारांना दूर ठेवण्यास मदत होते.  

कोणत्या आजारांना ठेवते दूर?

सायनसच्या रूग्णांसाठी हे मिश्रण फायदेशीर आहे. हळद, लवंग आणि लसूण यामुळे सायनसचे इंफेक्शन दूर होण्यास मदत होते. यामुळे कफ मोकळा होऊन नाकही मोकळे होण्यास मदत होते.  

गैसट्रायटिसचा त्रास कमी करण्यास मदत होते. या मिश्रणामुळे पोटात अ‍ॅसिड बनण्याची शक्यता कमी होते. गैसट्रायटिस, पोट फुगणं, पोटदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.  

शरीरात वाढणारे इंफेक्शन कमी होण्यास मदत होते. या मिश्रणामध्ये अ‍ॅन्टी इन्फ्लामेटरी म्हणजेच दाहशामक गुणधर्म फायदेशीर ठरतात. या मिश्रणामुळे शरीरात  वाढणारी सूज, जळजळ कमी होण्यास मदत होते. 

मधुमेहींनादेखील हे मिश्रण फायदेशीर ठरते. या मिश्रणामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.