मुंबई : 'फीटनेस' हा प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे.
अनेकजण तज्ञांच्या मदतीशिवाय स्वतःच फीटनेस रिजिम ठरवतात. पण त्यामध्ये चूका झाल्यास नकळत फायद्यांऐवजी इजा होण्याचा धोका अधिक असतो. म्हणूनच तज्ञांच्या मदतीशिवाय स्क्वॉट करायला सुरूवात करू नका
स्क्वॉट हा घरच्या घरी करता येण्यासारखा सोपा व्यायामप्रकार आहे. याच्या फायद्यांबाबत सेलिब्रिटी आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांनी खास सल्ला दिला आहे.
हाडांची बळकटी वाढते, बोन टेन्सिटी सुधारते.
मांड्यांजवळील भागात चरबी वाढल्याने जीन्स किंवा पॅन्टमधून तेथील भाग बाहेर आल्यासारखा वाटतो. तुम्हांला या त्रासामधून सुटका हवी असल्यास स्क्वॉट अवश्य करावा.
अनेक स्त्रियांना मासिकपाळीच्या दिवसांमध्ये वेदनांचा त्रास होतो. पोटात क्रॅम्स येतात. हा त्रास कमी करायचा असेल तर नियमित स्क्वॉट्स करावेत. यामुळे महिन्यातील ते ५ दिवस तुम्हांला त्रासदायक वाटणार नाहीत.
आजकाल पीएमएसचा त्रासही अनेक स्त्रियांमध्ये वाढत आहे. पीएमएस मूड स्विंगचा त्रास आटोक्यात ठेवायचा असेल तर स्क्वॉट्स करावेत.
मधूमेहींसाठीही स्क्वॉट्स फायदेशीर आहेत. यामुळे इन्सुलिन सेन्सिटीव्हिटी सुधारते. मधूमेहाचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते.
ताणतणावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी स्क्वॉट्स फायदेशीर ठरते.
निद्रानाश कमी करण्यासोबतच आरामदायी झोप मिळवण्यासाठी स्कॉट्स फायदेशीर ठरते.